कौन बनेगा करोडपतीच्या फ्लॅटफॉर्मवर भावना वाघेलांनी रोवला कोकणी झेंडा अन् जिंकले ५० लाखांचे बक्षिस

kon banega karodpati platform bhavna vaaghela prize of Rs 50 lakh in the twelfth season
kon banega karodpati platform bhavna vaaghela prize of Rs 50 lakh in the twelfth season

रत्नागिरी : येथील पालिकेच्या प्राथमिक शिक्षिकेने केबीसीच्या (कौन बनेगा करोडपती) फ्लॅटफॉर्मवर कोकणी झेंडा रोवत बाराव्या सिझनमध्ये ५० लाखांचे बक्षिस जिंकले. १ करोडच्या प्रश्‍नापर्यंत पोहोचलेली ही कोकण कन्या आहे, भावना प्रवीण वाघेला (रा. रत्नागिरी). १५ वा प्रश्‍न क्विट करत गेम सोडल्याने तिला ५० लाखावरच समाधान मानावे लागले. 

रत्नागिरीतील भावना वाघेला या पालिकेच्या शिक्षिकेच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कौन बनेगा करोडपतीचे ११ सेशन पूर्ण झाले असून १२ सुरू आहे. पहिल्या सेशनपासूनच अनेक महिला केबीसीच्या फ्लॅटफॉर्मवर बिग बी अमिताब बच्चन यांच्यासोबत हॉटसीटवर बसण्याचे स्वप्न पहात आहेत. कोकणातील महिला त्याला अपवाद होत्या. मात्र, कोकणातील महिला यात मागे नाहीत, हे वाघेला यांनी दाखवून दिले. 

जिद्द आणि चिकाटीमुळे १२ व्या सिझनला बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासमोरील हॉटसीटवर बसण्याचे स्वप्न पूर्ण झाले. महानायकासमोर उत्तरे देणाऱ्या या कोकणकन्येने केबीसीचा फ्लॅटफॉर्मच भाराउन टाकला. कोकणकन्येला देखील १ कोटी रुपये मिळवणार, असा विश्‍वास होता. बिगबींनी १ कोटी रुपयांसाठी १५ वा प्रश्‍न भावना वाघेला यांना केला. १५ व्या ऑलिम्पिकमध्ये कोणत्या महिला ॲथलिटने सर्वात जास्त मेडल मिळवली आहेत? असा प्रश्‍न होता. लाईफलाईन देखील संपल्या होत्या. देशवासीयांच्या नजरा असतानाच या कोकणकन्येने १५ व्या  प्रश्‍नाला गेम क्विट केला. 

फसवणूक आणि ५० लाख रुपये उभे करण्याचे आव्हान


भावना यांचे पती प्रवीण वाघेला यांनी आपल्या मित्रासमवेत भंगाराचा व्यवसाय सुरु केला होता. त्यासाठी ५० लाख रुपयांचे भांडवल गोळा केले. जमीन विकली, पैसे साठवून ही रक्कम पतीच्या मित्राला दिली. मात्र, मित्राने फसवणूक केली आणि पळुन गेला. वाघेला कुटुंबाला मोठा धक्का बसला. ५० लाख रुपये उभे करण्याची चिंता तिला सतावत होती. केबीसी हा एक पर्याय होता. केबीसीच्या १२ व्या सिझनमध्ये भावना वाघेला यांचा प्रवेश झाला. अमिताभ बच्चन यांच्यासमोरील हॉटसीटवर बसून आपल्या जीवनातील पैलुंचा उलगडा केला.

पालिकेच्या शाळेत मी प्राथमिक शिक्षिका आहे. अनेक वर्षांपासन केबिसीमध्ये जाण्याचे माझे स्वप्न होते, ते पूर्ण झाले. तसेच पालिकेच्या शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. या शिक्षकांमध्ये गुणवत्ता असते, शिक्षक देखील कशातच कमी नाहीत, हा संदेश यातून गेला. 
-भावना वाघेला, प्राथमिक शिक्षिका, रत्नागिरी पालिका.

संपादन-अर्चना बनगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com