देवरुखात थांबला पाऊस; गणपतीने आणला, गौरीने थांबवला पाऊस

प्रमोद हर्डीकर
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

साडवली (रत्नागिरी) : गणेशचतुर्थीला गणरायांचे आगमन झाले आणि बाप्पांनी आपल्याबरोबर येताना पाऊस घेवून आले.दोन दिवस तुफानी पाऊस पडला माञ मंगळवारी गौराई घरोघरी आल्या आणि त्यांनी हा पाऊस थांबवला.
रविवार,सोमवार हा पावसाने धुमाकुळ घातलेला वार होता.गणपती आल्यापासुन पावसाने जोर कायम ठेवला होता.त्यामुळे भाविकांना गणेशदर्शनासाठी बाहेर पडणेही मुश्कील झाले होते.मंगळवारी सकाळपासून या पावसाने विश्रांती घेतली आणि गौराईचे आगमन उत्साहात झाले.

देवरुख परीसरात खड्यांची आणि मुखवट्यांची गौराई स्थानापन्न झाली.एक माहेरवाशिन म्हणून गौराईचा मान केला जातो.तीन दिवसांसाठी हि गौराई घरोघरी आली असून या गौराईने हा पाऊस थांबवला आहे.मुंबईत पावसाने कहर केला माञ देवरुखात हा पाऊस थंडावला.
गौराईच्या आगमनामुळे गणेशोत्सवात भाविकांचा उत्साह वाढला आहे. तीन दिवसांसाठी आलेल्या गौराईला गोडाचाआणि काही ठीकाणी तिखटाचा नैवेद्य दाखवला जातो.गौरी म्हणजेच महालक्ष्मी.घरात चिरंतर टिकणारी सुख ,शांती, आणि समृद्धि घेवून येते.म्हणून तीचे स्वागतही जोरदार होते.गौरी सणासाठी विशेष सजावटही केली जाते.मुखवटे धारण केलेली गौरी भाविकांचा उत्साह वाढवणारी ठरते.

या सणासाठी सासरी गेलेल्या लेकी खास सणासाठी माहेरी धाव घेवून गौरीची सेवा करुन तीचे आशीर्वाद घेतात.
यंदा गणेशोत्सव सात दिवसांचा असल्याने गौरीचा तीन दिवस मुक्काम असणार आहे.
कोकणात गणेशोत्सवात जोरदार पाऊस झाल्याने नद्यांना महापूर आले.मंगळवारी कोकणात पाऊस थंडावला आणि मुंबईत पावसाने हाहाःकार उडवला.गणपतीने पाऊस आणला आणि गौराईने तो थांबवला अशी देवरुखला परिस्थिती झाली आहे.

Web Title: konkan marathi news devrukh rains