गुन्हे वाढल्याने आंबोलीत बसविणार सीसीटीव्ही

अनिल चव्हाण
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

सावंतवाडी : आंबोली येथे गेल्या आठवड्यात घडलेल्या गुन्ह्यांच्या सत्राचे प्रमाण लक्षात घेता हे सर्व प्रकार टाळण्यासाठी कोल्हापूर बेळगाव रस्त्यावरील तिठ्यावर आजपासून पोलिस चौकी उभारण्यात आली आहे.

याबाबतची मागणी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली होती. याबाबत त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आदेश दिल्याचे समजते.

यात नव्या चौकीवर चार पोलिस नेमण्यात आले आहेत. तर आंबोलीत असलेल्या तपासणी नाक्यावर पोलिस कुमक वाढविण्यात आली आहे, परिसरातील सीसीटीव्ही अॅक्टिव्ह करण्यात येणार आहेत, असे उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

    Web Title: konkan marathi news sawantwadi crime cctv