शेतकरी बांधवांनो, भात कापणीसाठी काही दिवस थांबा !

अमित गवळे
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक इंच पाऊस जरी पडला तरी तो कापलेल्या पिकासाठी हानीकारक आहे. पावसात भिजून खराब होण्यापेक्षा शेतातील उभे पिक परवडेल.त्यामुळे शेतकऱयांनी  कोणतेही पिक कापण्याची घाई करु नये. थोडे दिवस थांबावे

पाली - जिल्ह्यात सर्वत्र भाताचे पिक चांगले अाले आहे. हळव्याचा भात तर अाता कापणीला अाला आहे. परंतू काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकर्यांनी भात कापणी दोन दिवस पुढे ढकलावी असा संदेश 'किसान' कडून फिरत आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पांडूरंग शेळके यांनी देखिल शेतकर्यांनी भात कापणीसाठी काही दिवस थांबावे असे अावाहन सकाळच्या माध्यमातून केले आहे.

पुढिल दोन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तयार झालेल्या हळव्या भात जातीची कापणी पुढे ढकलावी असा संदेश किसान कडून मोबाईलवर आला आहे. या बाबत अधिक माहिती घेण्यासाठी सकाळने जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधला असता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पांडूरंग शेळके यांनी देखील भात कापणीसाठी काही दिवस थांबावे असे अावाहन केले अाहे. ते म्हणाले की पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक इंच पाऊस जरी पडला तरी तो कापलेल्या पिकासाठी हानीकारक आहे. पावसात भिजून खराब होण्यापेक्षा शेतातील उभे पिक परवडेल.त्यामुळे शेतकऱयांनी  कोणतेही पिक कापण्याची घाई करु नये. थोडे दिवस थांबावे, असे शेळके यांनी सकाळला सांगितले.

खबरदारी घ्या

जर कोणी पिक कापले असेल तर त्यांनी अापले पिक किंवा धान्य प्लास्टिक टाकून चांगल्या प्रकारे झाकून ठेवावे. कापलेले पिक प्लास्टिकने झाकून उंचावर ठेवावे.उत्तम पर्याय म्हणजे पिक न कापता शेतात अाहे तसेच ठेवावे. जेणेकरुन पाऊस पडला तरी पिकाचे नुकसान होणार नाही.

शेतकऱ्याचे दोन्ही बाजुने नुकसानच

वेळेत कापणी केली नाही तर भाताचे नुकसान होण्याची शक्यता अाहे. भात ८० ते ८५ टक्के पिकल्यावर भाताची कापणी करणे योग्य असते. उशिरा कापणी केल्यास तांदळाचा उतारा चांगला मिळत नाही. तांदूळ चुरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होते.अशा परिस्थितीत शेतकर्यांनी काय करावे हा प्रश्न समोर उभा राहिला आहे.

- मनिष पाटील, शेतकरी

Web Title: konkan news: agriculture farmers