अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

सायंकाळी  सांगेली येथील पोलीस पाटील श्री डोईफोडे गावात गस्त घालताना नायर नावाच्या रबर लागवडीच्या शेतीच्या बाजूला असलेल्या झोपडीत एक मुलगी दिसली. त्यांनी तिला माहीती विचारली असता तीने असंबध्द उत्तरे दिली. तसेच आपले लग्न झाले असून आपण पती सोबत राहता असल्याचा दावा तिने केला. परंतू तीचे वय लक्षात घेता त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यामुळे त्यांनी याबाबतची  माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयांस दिली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली

सावंतवाडी - अल्पवयीन मुलीला पळवून आणून तालुक्यातील सांगेली येथील जंगलमय भागात असलेल्या रबराच्या बागेत तब्बल आठ महिने लपवून ठेवणाऱ्या 
बुलढाणा येथील तरुणाचा पर्दाफाश करण्यात सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे 

गावचे पोलिस पाटील विठ्ठल डोईफोडे यांच्या जागरूकीमुळे  हा प्रकार काल रात्री उघड झाला. समाधान सिद्धांत वावळे (वय 25) असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान त्यातील मुलीला महिला कल्याण समितीसमोर हजर करून  दोघांना आज सायंकाळी बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहीती पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की  बुलढाणा, देऊळ राजे  येथील या युवकाने तब्बल आठ महिन्यापूर्वी तेथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले होते. त्याठिकाणी त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा शोध बुलढाणा पोलीस घेत होते. दरम्यान काल सायंकाळी  सांगेली येथील पोलीस पाटील श्री डोईफोडे गावात गस्त घालताना नायर नावाच्या रबर लागवडीच्या शेतीच्या बाजूला असलेल्या झोपडीत एक मुलगी दिसली. त्यांनी तिला माहीती विचारली असता तीने असंबध्द उत्तरे दिली. तसेच आपले लग्न झाले असून आपण पती सोबत राहता असल्याचा दावा तिने केला. परंतू तीचे वय लक्षात घेता त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यामुळे त्यांनी याबाबतची  माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयांस दिली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली.

दोघांची चौकशी केली असता ती मुलगी ही अल्पवयीन असून गेल्या आठ महिन्यांपासून वावळे याच्यासोबत राहत असल्याची माहिती उघड झाली. त्यामुळे त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले व याबाबतची माहिती बुलढाणा पोलिसांना दिली. आज सकाळी तेथील पोलिस पथक त्या ठिकाणी दाखल झाले व त्यांना घेऊन गेले.

याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक श्री. धनावडे यांनी दिली. ते म्हणाले  संबंधित मुलगी बुलढाणा येथील आहे. येथील एका मल्याळी नागरिकाच्या बागेत ती काम करत होती. हा सर्व प्रकार पोलिस पाटलाच्या जागृतीमुळे उघड झाला आहे. अपहरण करून फरार असलेल्या त्या तरुणाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. अल्पवयीन मुलीला कामाला ठेवणाऱ्या नायर या व्यक्तीची चौकशी करण्यात येणार आहे. तो  पुणे येथे राहतो. माहीती न घेता अशा लोकांना आपल्याकडे कामाला ठेवले तसेच पोलिसांपासून माहीती लपविली, असा ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हा  दाखल करण्यात येणार आहे असे धनावडे यांनी सांगितले

Web Title: konkan news: arrest police