रसायनी: पुलाची डागडुजी करण्याची ग्रामस्थांची मागणी

लक्ष्मण डुबे
सोमवार, 19 मार्च 2018

पुलाच्या डागडुजीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. जिल्हा परिषद सेस मधुन निधि मंजुर झाला आहे. एस टी बस आणि इतर वाहतुक चावणे मार्गे पुर्ववत होईल. त्यासाठी लवकरात लवकर काम करण्यासाठी  ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहे असे चावणे ग्रामपंचायतीच्या सुत्रातुन सांगितले. 

रसायनी (रायगड) : रसायनीतील चावणे गावा जवळील ओढ्यावरील पुल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. म्हणुन पनवेल एसटी आगाराने चावणे मार्गे सवने एसटी बस बंद केल्या आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तर पुलाची डागडुजी करण्यात यावी आशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

पनवेल एसटी आगारातुन चार सवने एसटी बस सोडण्यात येत आहे. चावणे गावा जवळून सवने कडे जाणा-या रस्त्याची सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या मुसळधार पावसात खुपच दुरावस्था झाली होती. रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे आणि ओढ्या वरील धोकादायक पुलामुळे एस टी महामंडळाने चावणे  मार्गे एस टी बस बंद केल्या आहे. दिड वर्षापासुन चावणा गावातील आणि पेरूची वाडीतील ग्रामस्थांना  पनवेलकडे ये-जा करताना एमआयडीसी सर्कलवर चढ-उतार करावी लागत आहे. जाताना एक दीड किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान चावणा ते  खुटलाचीवाडी एस टी थांबा पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण एक वर्षापुर्वी करण्यात आले आहे. मात्र एस टी पुर्ववत सुरू  करण्यात न आल्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल होत आहे. चावणा मार्गे एस टी बस पुर्ववत सुरू कराव्यात त्यासाठी पुलाला संरक्षक कठाडे बांधावे आणि इतर डागडुजीचे काम करण्यात यावे आशी मागणी रमेश पाटील आणि ग्रामास्थांनी केली आहे. 

पुलाच्या डागडुजीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. जिल्हा परिषद सेस मधुन निधि मंजुर झाला आहे. एस टी बस आणि इतर वाहतुक चावणे मार्गे पुर्ववत होईल. त्यासाठी लवकरात लवकर काम करण्यासाठी  ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहे असे चावणे ग्रामपंचायतीच्या सुत्रांतुन सांगितले. 

Web Title: Konkan news bridge work in rasayani