धनगरवाडीचे रस्ते, पाखाड्या खुल्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

चिपळूण - पोफळी-धनगरवाडी मार्गावरील वादग्रस्त रस्ता व अंतर्गत पाखाड्या मोकळ्या झाल्या. तहसीलदार जीवन देसाई यांनी येथे पाहणी केली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा तसेच लोकवस्तीकडे जाणाऱ्या तिन्ही बंद पाखाड्या रहदारीस मोकळ्या झाल्या आहेत. डांबरीकरण झालेला रस्ता वाहतुकीस मोकळा आहे. केवळ भातशेती केलेला रस्ता वादग्रस्त आहे. त्यावर बांधकाम विभागास त्वरित तोडगा काढावा, अशी सूचना तहसीलदार जीवन देसाई यांनी दिली.

पोफळी-धनगरवाडी मार्गावरील वादग्रस्त ठरलेल्या रस्त्याविषयी शुक्रवारी तहसीलदार जीवन देसाई यांनी धनगरवाडी ग्रामस्थ, शिरगाव पोलिस निरीक्षक निशा जाधव, जमीनमालक व माजी सरपंच चंद्रकांत सुवार, पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, बांधकाम उपअभियंता श्री. साळवी यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत धनगरवाडीकडे जाणारा रस्ता, शाळेकडे जाणारी व लोकवस्तीकडे जाणारी पाखाडी रहदारीस बंद असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले होते. त्यामुळे देसाई यांनी धनगरवाडी रस्ता व अंतर्गत पाखाड्यांची पाहणी केली. बैठकीत दिलेल्या सूचनेप्रमाणे अंतर्गत पाखाड्या मोकळ्या झाल्याचे घटनास्थळी दिसून आले. शाळेकडे जाणारी पर्यायी पायवाट धोक्‍याची आहे. त्यामुळे येथील पाखाडीही मोकळी ठेवण्याची सूचना केली. धनगरवाडी मार्गावरील मध्यभागी असलेल्या भातशेतीचा भाग वगळता अलीकडे व पलीकडीलडचा भाग रहदारीस मोकळा आहे. भातशेती केलेला भाग केवळ वादग्रस्त आहे. त्याठिकाणी कोणीही कायदा हातात घेण्याची कार्यवाही करू नये, असे तहसीलदारांनी सांगितले.

कार्यकारी अभियंत्यांची चौकशी
रस्त्यावरील अतिक्रमण काढल्याने कार्यकारी अभियंताच चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे यापुढील काळात जिल्हा परिषद बांधकाम विभाग कोणती कार्यवाही करणार, याकडे लक्ष लागले आहे. पाहणीदरम्यान शिरगाव पोलिस निरीक्षक, बांधकाम उपअभियंता, जमीनमालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

पोफळी-धनगरवाडी मार्गावरील रस्ता जिल्हा परिषदेच्या ताब्यात असून रस्ते विकास योजनेत त्याची नोंद आहे. संबंधितांनी जमीन खरेदी केल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर खर्च केला आहे. त्यामुळे या रस्त्याविषयी योग्यवेळी कागदपत्रे सादर करू.
- विश्‍वनाथ ऊर्फ बाबू साळवी, पंचायत समिती सदस्य

Web Title: konkan news chiplun news