नारळ महागला; दररोज तीन हजारांहून अधिक विक्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

चिपळूण - गणेशोत्सवाच्या काळात शहरात दररोज तीन हजारहून अधिक नारळांची विक्री होत आहे. गणरायाच्या आगमनापासून ते त्याच्या विसर्जनापर्यंत नारळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात मोदक, पूजा, नवस फेडणे, तोरण यामध्ये वापरावे लागत असल्याने नारळांची विक्री वाढली आहे. अगरबत्ती, कापूर, अष्टगंध, फुले, फळे, चिरमुरे यांची रोजची उलाढाल काही हजारात पोहोचली आहे. 

चिपळूण - गणेशोत्सवाच्या काळात शहरात दररोज तीन हजारहून अधिक नारळांची विक्री होत आहे. गणरायाच्या आगमनापासून ते त्याच्या विसर्जनापर्यंत नारळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात मोदक, पूजा, नवस फेडणे, तोरण यामध्ये वापरावे लागत असल्याने नारळांची विक्री वाढली आहे. अगरबत्ती, कापूर, अष्टगंध, फुले, फळे, चिरमुरे यांची रोजची उलाढाल काही हजारात पोहोचली आहे. 

गुहागरी नारळ सर्वत्र प्रसिद्ध आहे. येथील व्यापाऱ्यांनी तामिळनाडू, कर्नाटक येथूनही नारळ आयात केले आहे. कोल्हापूर येथील घाऊक विक्रेत्यांकडून तामिळनाडू, कर्नाटक येथील नारळ आणले जातात. कोल्हापूर येथून दिवसआड एक गाडी मागवली जात आहे. गणरायाला २१ मोदकांच्या नैवेद्याशिवाय उत्सवाची पूर्तता होत नाही. या मोदकाला खास कर्नाटकी नारळाच्या खोबऱ्याचा किस लागतो. कर्नाटकी नारळाच्या खोबऱ्याला जाडी अधिक असते. त्याचा दरही नियमित नारळापेक्षा अधिक आहे. शेकडा १८०० ते २५०० असा घाऊक बाजारात दर आहे. किरकोळ बाजारात २० ते २५ रुपये प्रतिनग दराने हा नारळ विकला जातो. तोरणासाठी व गणरायाला वाहनासाठी तामिळनाडूतील शेंडीवाल्या नारळाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. घाऊक बाजारात याचा दरही शेकडा १०५० रुपये इतका आहे. गणरायाची आरास करण्यासाठी विविध सुगंधी फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. फुल बाजारातील गणेशोत्सव काळातील उलाढाल वाढली आहे. गलाटा, गुलाब, झंडू, ॲस्टर, केवडा, कमळांचेही दर वाढले आहेत. सुगंधी वातावरण निर्मितीसाठी दीर्घकाळ जळणाऱ्या वेगवेगळ्या अगरबत्तीही बाजारात आल्या आहेत. कापूरच्या अगदी रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत आहेत. यासह केवळ होम हवनसाठी भीमसेन काळा कापूरही बाजारात विक्री उपलब्ध आहे. विशेषही या कापूराचा वापर स्वाईन फ्लूला प्रतिबंध करण्यासाठी रुमालामध्ये एक तुकडा ठेवला जातो. त्यामुळे या कापूरालाही मागणी वाढली आहे. याचा दरही १० ग्रॅमला ३५ रुपयांना आहे. 

गणेशोत्सव काळात मोठ्या अगरबत्तींनाही मागणी आहे. विशेषत: एक रुपयांपासून अगदी ५०० रुपयांपर्यंत अगरबत्तीच्या किमती आहेत. गणेशोत्सवात कापूरही मोठ्या प्रमाणात लागतो. यात छोटा, मोठा, षटकोनी, चौकोनी असे १० ग्रॅम पासून किलोच्या पॅकिंगमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. 
-राहुल बांद्रे, गोवळकोट

Web Title: konkan news coconut chiplun