मुलाच्या सतर्कतेमुळे  चोरीचा प्रयत्न फसला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

सिंधुदुर्गनगरी - ओरोस खर्येवाडी येथे एका बंगल्यात दिवसा ढवळ्या चोरी करण्यासाठी आलेल्या एका टोळीचा प्रयत्न त्याच घरातील मुलाने हाणून पाडला. यात चार चोर होते. हे सर्व चोर स्त्री वेशात होते.

सिंधुदुर्गनगरी - ओरोस खर्येवाडी येथे एका बंगल्यात दिवसा ढवळ्या चोरी करण्यासाठी आलेल्या एका टोळीचा प्रयत्न त्याच घरातील मुलाने हाणून पाडला. यात चार चोर होते. हे सर्व चोर स्त्री वेशात होते.

खर्येवाडी येथील एका बंगल्यात मागच्या दारातून चोरी करण्यासाठी चोर घुसले. चोरी करत असतानाच त्या बंगल्यात राहात असलेल्या मुलाने पुढच्या बाजूने दरवाजा उघडला, तोच पहातो तर त्या मुलाला आपल्या बंगल्यात चौघेजण चोरी करत असल्याचे दिसून आले. चोरांची नजर त्या मुलावर पडताच लागलीच त्यांनी मागच्या दरवाजातून पळ काढला. रस्त्यालगत उभी करून ठेवलेल्या चारचाकी वाहनामधून पळ काढला. धक्कादायक बाब म्हणजे या चारही चोरांनी साडी परिधान केली होती असे प्रत्यक्षदर्क्षी पाहिले. या दिवसाढवळ्या घडलेल्या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे; मात्र या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली नव्हती.

गेल्या काही महीन्यापूर्वी याच परिसरातील चोरट्यांनी दिवसा ढवळ्या तीन सदनिका फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या चोरीचा छडा लावण्यात पोलीसांना अद्याप यश आलेले नाही. आता चोरांचा वावर दिवसाही होऊ लागल्याने नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: konkan news crime

टॅग्स