मातृमंदिरच्या चौदा जणांवर अपहाराचा गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

देवरूख - कर्मचाऱ्यांसाठी आलेल्या भविष्य निर्वाह निधीमध्ये सुमारे 8 लाख 26 हजार 160 रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी येथील प्रसिद्ध मातृमंदिर या सेवाभावी संस्थेतील एकूण चौदा जणांवर देवरूख पोलिस ठाण्यात संशयित म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यासंदर्भात देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी ः भविष्य निर्वाह निधी कोल्हापूर विभागीय कार्यालयातील अधिकारी नितीन गंगाधर डेकाटे (42, कोल्हापूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. कर्मचाऱ्यांसाठी आलेला भविष्य निर्वाह निधी त्या कर्मचाऱ्यांच्या पगारात जमा न करताच अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा अपहार मे 1995 ते फेब्रुवारी 2005 या कालावधीत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

याप्रकरणी मातृमंदिर संस्थेतील बाबूराव बळवंत मुळीक (कोल्हापूर), जगदीश शांताराम नलावडे (परळ, मुंबई), रामकृष्ण हरी कोळवणकर (मानखुर्द, मुंबई), दीपक जगन्नाथ जाधव (लांजा), विजय गोपाळ नारकर (देवरूख), अभिजित श्रीराम हेगशेट्ये (रत्नागिरी), आत्माराम जगन्नाथ मेस्त्री (राजापूर), सुहासिनी तावडे (बोरिवली, मुंबई), संतोष गोरखिनाथ घाग (जोगेश्‍वरी, मुंबई), संतोष नारायण शेट्ये (साखरपा), सुनील मारुती कोळवणकर (देवरूख), सौ. पल्लवी आशीष कोरगावकर (कोल्हापूर), शांता विजय नारकर (देवरूख), प्रकाश गणपत बेर्डे (देवरूख) या चौदा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सुरू असल्याचे देवरूख पोलिसांनी सांगितले.

Web Title: konkan news crime