सुधागड नाभिक समाजाच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा निषेध

agitation
agitation

पाली -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाचा अवमान केल्या प्रकरणी सुधागड तालुका नाभिक समाज सेवा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. पाली-सुधागड तहसिलदार बि.एन.निंबाळकर यांना नुकतेच निवेदन देवून निषेध दर्शविण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ पाली पोलीस स्थानकांत देखिल निवेदन देण्यात आले.

दौड तालुक्यातील पाटस येथील भिमा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर टिका करतांना नाभिक समाजाचा न्हावी असा एकेरी व अवमानकारक उल्लेख केला. हा अवमानकारक उद्गार काढल्याने नाभिक समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल मुख्यमंत्री फडणविस यांचा नाभिक समाजाच्या वतीने सर्वत्र निषेध केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी समस्त नाभिक समाजाची माफी मागावी अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी माफी न मागितल्यास नाभिक समाज रस्त्यावर उतरुन तिव्र आंदोलन छेडेल असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी सुधागड तालुका नाभिक समाज अध्यक्ष भगवान निमुतकर, उपाध्यक्ष प्रभाकर टके, परळी जांभुळपाडा विभागीय अध्यक्ष रुपेश जाधव, पेडली विभाग अध्यक्ष रविंद्र जाधव, नाडसूर विभाग अध्यक्ष सुभाष पांडव,दिपक शिंदे, नारायण पवार, नितीन पांडव, राजू गुजर,नेताजी पवार, रमेश भोसले, बबन जाधव, रुपेश पवार,जितेश शिंदे, निलेश जाधव, सुनिल साळुंके, रमेश पांडव,प्रदिप पवार, महेश कदम, सचिन देवेकर आदिंसह नाभिक समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.सुधागड तालुका नाभिक समाजाच्या वतीने देण्यात आलेले निवेदन पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. असे पाली-सुधागड तहसिलदार बि.एन.निंबाळकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात नाभिक समाजबांधवांचा न्हावी असा एकेरी व अवमानकारक उल्लेख करुन अवमानकारक उद्गार काढल अाहे. त्यामुळे समस्त नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. नाभिक समाजाच्या वतीने मुख्यमंत्री फडणविस यांचा जाहीर निषेध केला जात अाहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत समस्त नाभिक समाजाची लवकर माफी मागावी अन्यथा तिव्र आंदोल छेडले जाईल.

- भगवान निमुतकर, अध्यक्ष, सुधागड तालुका नाभिक समाज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com