सावंतवाडी: गंभीररीत्या भाजलेल्या 'त्या' लेकीची मदतीसाठी हाक

अमोल टेंबकर
शुक्रवार, 14 जुलै 2017

प्लास्टीक सर्जरी ः दहा वर्षापासून सांभाळतेय भाजल्याचे व्रण

सावंतवाडी: अंगावर दिवा पडून वयाच्या सातव्या वर्षी गंभीररीत्या भाजलेल्या कुंभवडे येथील त्या लेकीला आता पुन्हा एकदा मदतीची गरज आहे. सुनिता महादेव कांबळे (वय 17) असे तिचे नाव आहे. तिच्यावर प्लास्टीक सर्जरी करण्यात येत आहे. त्यासाठी समाजातील दात्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

प्लास्टीक सर्जरी ः दहा वर्षापासून सांभाळतेय भाजल्याचे व्रण

सावंतवाडी: अंगावर दिवा पडून वयाच्या सातव्या वर्षी गंभीररीत्या भाजलेल्या कुंभवडे येथील त्या लेकीला आता पुन्हा एकदा मदतीची गरज आहे. सुनिता महादेव कांबळे (वय 17) असे तिचे नाव आहे. तिच्यावर प्लास्टीक सर्जरी करण्यात येत आहे. त्यासाठी समाजातील दात्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

आठ वर्षापुर्वी हा प्रकार घडल्यानंतर ‘सकाळ’ने तिच्या मदतीसाठी प्रकाशझोत टाकणारे वृत्त प्रसिद्ध केले होते. यावेळी तत्कालीन परिस्थितीत अनेक दात्यांनी पुढाकार घेवून तिला मदतीचा हात दिला होता; मात्र आता ऐन तारुण्यातील जीवन जगण्यासाठी तिच्या पाठिशी पुन्हा एकदा राहणे गरजेचे आहे. हा दुदैवी प्रकार कुंभवडे येथील सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील तिचे वडील महादेव कांबळे यांना सहन करावा लागत आहे. सात वर्षापुर्वी अवघ्या नऊ वर्षाची असताना घरात खेळत असलेल्या सुनिता हिच्या अंगावर रॉकेलचा दिवा पडला आणि तिच्या छातीकडील भाग मोठ्या प्रमाणात भाजला. अशा परिस्थितीत तिला गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले. त्या ठिकाणी तिच्यावर उपचार करण्यात आले; मात्र या सर्व प्रक्रियेत कांबळे यांची घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्यामुळे जिल्ह्यातल्या दानशुर व्यक्तींनी तिला मदत केली; आता मात्र या कुटुंबासमोर वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजलेल्या त्या जागेवर प्लास्टीक सर्जरी करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिला आहे. त्यासाठी सांगली येथील मेडीकल कॉलेजमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी सर्जरीची प्रक्रिया झाली असली तरी आता पुढील खर्चासाठी आणि सर्जरीतील अन्य काही प्रक्रियेसाठी श्री. कांबळे यांना आणखी मदतीची गरज भासत आहे. त्यामुळे त्यांनी समाजातील दानशुरांपुढे आपल्याला मदत करावी अशी आर्जव केली आहे.

आर्थिक मदतीसाठी :
या कुटुंबास कोणी सहकार्य करू इच्छीत असल्यास महादेव कांबळे, बँक ऑफ इंडीया, आंबोली शाखा, खाते क्रमांक 141610410000250 या खात्यावर आपली मदत जमा करावी.
अधिक माहितीसाठी 9922316777 या नंबरवर संपर्क साधावा

खर्चिक उपचार
याबाबतची माहिती श्री. कांबळे यांनी ‘सकाळ’च्या सावंतवाडी कार्यालयात येवून दिली. ते म्हणाले, 'सांगली आणि सावंतवाडीतील काही व्यक्तींनी मदत केल्यामुळे आणि आपल्याकडे असलेले तुटपुंजे पैसे मिळून प्लास्टीक सर्जरीचा दोन लाखाहून अधिक पेलणे आपल्याला शक्य झाले; मात्र यापुढे सुद्धा आणखी बराच खर्च आहे. सद्यस्थितीत तिच्यावर बांबुळी येथे उपचार सुरू आहेत. तिला त्याच ठिकाणी गोव्यात भाड्याची खोली घेवून ठेवण्यात आले आहे. रोज रुग्णालयात ने-आण करावी लागते. सांगली येथे दर पंधरा दिवसातून एकदा जावे लागणार आहे. तिला बरे होण्यासाठी आणखी सहा महिने लागणार आहेत. त्यामुळे मी कामाला जावू शकत नाही. त्यासाठी आपल्याला सहकार्य व्हावे.'

■ ई सकाळवरील महत्वाच्या ताज्या बातम्या
परभणी: दूबार पेरणीच्या संकटाने युवकाची आत्महत्या
साहेब, आम्ही दारिद्र्यातच जीवन जगावे का?
बारामती-फलटण रेल्वेमार्ग संपादनासाठी शेतकऱ्यांच्या सहकार्याची अपेक्षा
सिंधुदुर्ग-कणकवली रेल्वे मार्गावर माती कोसळल्याने रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प
मराठवाड्यात मुलीच्या लग्नाच्या चिंतेने शेतकऱ्याने संपविले जीवन
गेल्या महिन्याभरात साडेतीन हजार "चाईल्ड पोर्नोग्राफी' साईट्‌स बंद
नांदेडमध्ये वाहतूक शाखेची अडीच महिण्यात दमदार कारवाई
पुणेः नगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा खून करणारे दांपत्य ताब्यात
'एलआयसी'चे एयर इंडिया करू नका !; 'जीएसटी'ही काढा
भारतातील "फेसबुक युजर्स'ची संख्या जगातील सर्वोच्च...

Web Title: konkan news girl need economical help for hospital