जीएसटी आकारताना आधीच्या करांसह किमती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

चिपळूण - जीएसटी करप्रणालीची पूर्णपणे माहिती नसल्याने ग्राहकांची लूट होत आहे. हॉटेल किंवा किराणामध्ये मूळ किंमत लावून त्यावर जीएसटी आकारला जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा अव्वाच्या सव्वा फायदा होत आहे. जीएसटीबाबतच्या अज्ञानापोटी ग्राहकांच्या खिशाला चाट बसत आहे. जीएसटीच्या आडून व्यापारी अधिक नफा मिळवत आहेत.

वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये ०, ५, १२, १८ आणि २८ टक्के कर लावण्यात येतो. या प्रणालीमुळे केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व मिळून १० ते १५ कर इतिहासजमा झाल्याचे सांगण्यात येते.  नागरिकांमध्ये याची पुरेशी माहिती नसल्याचा फायदा व्यापारी उठवत आहेत. जीएसटी लागू होण्यापूर्वी एखादा व्यापारी एखादी वस्तू फलाण्या किमतीला विकायचा. त्यामध्ये सर्व कर समाविष्ट होते. तसेच व्यापाऱ्याचा फायदाही. आता त्याच किमतीवर व्यापारी जीएसटी घेतात. म्हणजे ग्राहकाच्या खिशाला चाट. वस्तूची मूळ किंमत माहित नसल्याने त्यावर किती कर व्यापारी लावतो, हे कळतच नाही. 

जिल्ह्यातील हॉटेल्स, शॉपिंग मॉल, ग्राहक बाजार व मोठमोठ्या व्यापाऱ्यांकडूनही ग्राहकाच्या खिशाला चाट दिली जाते. येथे बिलावर मूळ किंमत धरून कर लावला जातो. कराचे दर किती आणि कसे आहेत याची ग्राहकाला माहितीच नाही. जीएसटी आला तरी सर्व व्यापारी बिलाची पावती देत नाहीत. ज्या व्यापाऱ्यांची नोंदणी जीएसटीअंतर्गत झाली त्यांना दिलेला स्वतंत्र नंबर प्रत्येक बिलावर असणे आवश्‍यक आहे. मात्र, बिलावर तो नसतो. अनेक वेळा कच्ची बिलेच दिली जातात. शिवाय आधीच्या किमतीवर जीएसटी आकारला जातो, अशी ग्राहकांची तक्रार आहे. 

जीएसटी प्रणालीमुळे देशात वस्तूच्या खरेदी-विक्रीवर एकवाक्‍यता येणार आहे. या प्रणालीचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. या प्रणालीच्या नावाखाली कित्येकजण हात मारून घेत आहेत. ग्राहकांत जागृती यायला हवी. 
- राकेश सोनवणे, ग्राहक

Web Title: konkan news GST chiplun