अवैध वाळू वाहतूक करणारे ७ ट्रक जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

देवरुख - संगमेश्वर तालुक्‍यातील अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाने कारवाई केली आहे. महसूलच्या भरारी पथकाने काल (ता. ३०) रात्री संगमेश्वर-देवरूख मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणारे ७ ट्रक पकडले. त्यांच्यावर प्रत्येकी १ लाखाची अशी सात लाखांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती तहसीलदार संदीप कदम यांनी दिली.

महिनाभर संगमेश्वर तालुका महसूल विभागाने तालुक्‍यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाबरोबरच अवैध वाळू वाहतुकीलाही चाप लावला आहे. 

दोन आठवड्यांपूर्वी याच भरारी पथकाने १५ गाड्या पकडून त्यांच्याकडून १२ लाखांचा दंड वसूल केला होता. पाठोपाठ खाडी भागात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर कालची कारवाई झाली. रात्री तहसीलदार संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार विक्रम पाटील, मंडल अधिकारी नीलेश पाटील, तलाठी चंद्रकांत कांबळे यांनी संगमेश्वर-देवरूख मार्गावर वाळूची विनापरवाना वाहतूक करणारे ७ ट्रक पकडले. हे ट्रक परशराम सदाशिव वडार ( इस्लामपूर), संजय शामराव वडार (इस्लामपूर), रमेश गोविंद सकपाळ, अजित बाबू पाटील, महेश भिवाजी मकदूम, रमेश लक्ष्मण शिपुगडे (सर्व पन्हाळा, कोल्हापूर) यांचे असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. या सर्वांना प्रत्येकी १ लाख रुपये दंड आकारला आहे. आज संध्याकाळपर्यंत हे सर्व ट्रक तहसील कार्यालयासमोरच उभे होते.

Web Title: konkan news illegal sand transport