नाटळ घरफोडीप्रकरणी संशयितांची चौकशी सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

कणकवली - तालुक्‍यातील नाटळ-पांगमवाडी येथे शुक्रवारी दुपारी घरफोडी करून तीन लाख रुपये किमतीचे दागिने लांबविल्याप्रकरणी काही संशयितांची चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी सुनील नाना शिरसाट (वय ४९) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केल्यावरून गुन्हा नोंद झाला आहे. घटनास्थळी श्‍वानपथक आणि ठसेतज्ज्ञांकडून तपास घेण्यात आले आहेत. 

नाटळ-पांगमवाडी येथे शिरसाट यांचे घर असून, त्यांची पत्नी काल दुपारी शेजारच्या आजारी महिलेला पाहण्यासाठी गेली होती. साधारण अर्धा तास ती घराबाहेर होती. ही संधी साधून संशयित आरोपीने घरात पाठीमागील दरवाजाने प्रवेश केला. घराच्या कपाटातील सुमारे ८ तोळ्यांचे दागिने लंपास केले. यात सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, चैन, नथ, दोन रिंग जोड, डवली असा ऐवज होता. साधारण २ लाख ४३ हजार ९०० रुपये इतकी किंमत आहे. सुनील शिरसाट यांचे घर रस्त्यावर असल्याने संशयित आरोपीला पाळत ठेवून घरात सहज प्रवेश करता आला. शिरसाट यांची पत्नी व मुलगा असे त्यांचे कुटुंब आहे. शुक्रवारी शिरसाट हे नेहमीप्रमाणे ओसरगाव येथे कामावर गेले होते, तर मुलगा शाळेला गेला होता. घरी त्यांची पत्नी एकटीच होती. दुपारी जेवण आटोपल्यानंतर ती दीडच्या सुमारास घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून बाजूला असलेल्या घरातील वृद्धेची विचारपूस करण्यासाठी गेली होती. 

या वेळी पाठीमागील दरवाजा उघडा असल्याची संधी साधून संशयिताने आत प्रवेश केला असावा, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी कनेडी परिसरातील हिटलिस्टवर असलेल्या काही संशयितांना आज चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. या चोरीचा तपास पोलिस निरीक्षक शशिकांत खोत करीत आहेत.

Web Title: konkan news kankavali crime

टॅग्स