थेट सरपंच निवडणुकीने गावगाड्याला नवी दिशा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

मंडणगड - थेट सरपंच निवडीमुळे गावातील सर्वसमावेशक नेत्याला पसंती मिळणार आहे. थेट सरपंच निवडीत गावासाठी धडपडणाऱ्या व गावासाठी काहीतरी चांगले करण्याची धडपड असलेल्या युवकांचा गावच्या राजकारणात प्रवेश होणार आहे. ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी महिन्यात तालुक्‍यातील १७ ग्रा.पं.च्या निवडणुका होणार आहेत.

मंडणगड - थेट सरपंच निवडीमुळे गावातील सर्वसमावेशक नेत्याला पसंती मिळणार आहे. थेट सरपंच निवडीत गावासाठी धडपडणाऱ्या व गावासाठी काहीतरी चांगले करण्याची धडपड असलेल्या युवकांचा गावच्या राजकारणात प्रवेश होणार आहे. ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी महिन्यात तालुक्‍यातील १७ ग्रा.पं.च्या निवडणुका होणार आहेत.

थेट सरपंच निवडीमुळे भविष्यात गावगाड्यांच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल होतील. त्याचबरोबर नामधारी सरपंचांपासून गावाची मुक्ती होईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सरपंच होण्यासाठी आता सदस्यांची पळवापळवी होणार नाही. सरपंचांची निवड लोकांमधून करण्याबरोबरच १९९५ नंतर जन्मलेल्यांना सातवीपर्यंतच्या शिक्षणाची अट घातली आहे. यापूर्वी सरपंच होण्यासाठी शिक्षणाची अट नव्हती. त्यामुळे गावगाड्याच्या या राजकारणात अशिक्षितांची चलती होती. यापुढेही, १९९५ पूर्वी जन्मलेली अशिक्षित व्यक्ती सरपंचपदाची निवडणूक लढवू शकेल. त्यानंतर मात्र शिक्षण आवश्‍यक आहे. याचे काही थरातून स्वागत झाले आहे.

लोकरवण, अडखळ, कुंबळे, दुधेरे-बामणघर, विन्हे, पिंपळोली, देव्हारे, शिगवण, दहागाव, मुरादपूर, तोंडली, उन्हवरे, वाल्मिकीनगर, बाणकोट, सडे, तिडे-तळेघर, वेसवी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक व सरपंच निवडीच्यावेळी भाऊबंदकीचे राजकारण चालते. त्यातूनच गावामध्ये वैर निर्माण होते. सरपंच होण्यासाठी चढाओढ लागते. त्यासाठी सदस्यांची फोडाफोडी केली जाते. आता त्याला पायबंद बसेल.

निवडणांमध्ये लोक थोड्या पैशासाठी विकले जातात. संविधानाने मत दान करायची नाही तर मताधिकार बजावण्याची अपेक्षा ठेवली आहे. उमेदवारांना शून्य मते पडल्यामुळे ईव्हीएमवर शंका उपस्थित झाल्या. हे टाळण्यासाठी मशीनबरोबर कोणाला मत दिले याची पावती आली पाहिजे.
- अमोल माळी, इंजिनियर युवक मंडणगड

Web Title: konkan news mandangad news sarpanch