मंडणगडला पावसाने झोडपले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

मंडणगड - तालुक्‍यात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गणराय आगमनाच्या पूर्वसंध्येला सुरू झालेल्या पावसाने उसंत घेतली नाही. या मोसमात पावसाने ३०८८ मिमीपर्यंत मजल मारली असून, चार दिवसांत ३२८ मिमी पाऊस झाला आहे. गौराईच्या स्वागताला तालुक्‍यात विक्रमी पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळपर्यंत मंडणगड महसूल मंडळात १७५ मिमी, देव्हारे महसूल मंडळात १८१ मिमी, तर म्हाप्रळ महसूल मंडळात १६० मिमी पावसाची नोंद झाली. 

यंदाच्या मोसमात एक दिवसात पडलेला हा सर्वाधिक पाऊस असून, पावसाने मंडणगड तालुक्‍याला  अक्षरशः झोडपून काढल्याने गौरी गणपतीचे सणात लोकांना घरी अडकून पडावे लागले आहे.  दडी मारलेल्या पाऊस गणपती बाप्पाबरोबर पुन्हा सुरू झाला. गेल्या चार दिवसात पावसाचे प्रमाण हळूहळू वाढले आहे. तालुक्‍यातील सावित्री, भारजा, निवळी या नद्यांसह लहान-मोठे ओढे दुथडी भरुन वाहू लागले आहेत. पावसामुळे तालुक्‍यात झालेल्या  पडझडीची महसूल विभागाने पाहणी सुरू केली आहे. दिवसभर रिपरिप सुरूच असल्याने गर्दीने फुलणारी शहरातील बाजारपेठ दुपारनंतर ओस पडली होती.  पावसाने चाकरमान्यांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. आज सर्वत्र गौरीचे आगमन होणार असल्याने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होईल अशी अपेक्षा होती. 

Web Title: konkan news mandangad rain

टॅग्स