रत्नागिरीः दहा दिवसांत खून प्रकरणातील आरोपीला जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

रत्नागिरीः अवघ्या दहा दिवसांत पोलिसांनी केले खून प्रकरणातील आरोपीला जेरबंद केले आहे. रविवारी (ता. 20) सोमेश्वर सडा येथील दादर पुलाखाली सुहास लक्ष्मण घाटविलकर यांचा निर्घृण खून करण्यात आला होता.

रत्नागिरीः अवघ्या दहा दिवसांत पोलिसांनी केले खून प्रकरणातील आरोपीला जेरबंद केले आहे. रविवारी (ता. 20) सोमेश्वर सडा येथील दादर पुलाखाली सुहास लक्ष्मण घाटविलकर यांचा निर्घृण खून करण्यात आला होता.

गणपती उत्सवात कामाचा प्रचंड ताण असतांना देखील सखोल तपास करत पोलिसांनी घेतले संशयिताला ताब्यात घेतले आहे. आरोपी परिमल मुकुंद पवार (वय 25 राहणार सोमेश्वर, बौद्धवाडी) याने दिली गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीने सुरुवातीला पोलिसांना चुकीची माहिती देऊन संशयाची सुई दुसऱ्या दिशेला फिरविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. आरोपीच्या बहिणीवरून आरोपीचे आणि मयताचे पूर्वीपासून वाद होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने दिलेल्या विसंगत उत्तरांमुळे आरोपीचा बनाव जास्त काळ टिकला नाही.

पोलिस अधीक्षक श्री. प्रणय अशोक व अप्पर पोलिस अधीक्षक श्री. मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शिरीष सासणे यांच्या पथकाने गुन्ह्याचे गूढ उकलले.

Web Title: konkan news murder case police arrested accused

टॅग्स