पूररेषेच्या आत राहणाऱ्यांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

राजापूर - शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पुराचा शहराला वेढा पडतो. त्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांचे नुकसान होते. शासनाकडून निश्‍चित करण्यात आलेल्या पूररेषेच्या आत अजूनही अनेकजण राहत आहेत. हे सारे व्यापारी व नागरिक महसूल विभागाच्या रडारवर आले आहेत.

पुनर्वसन झाल्यानंतरही पूररेषेत राहत असलेले आणि ज्यांचे पुनर्वसन अद्यापही झालेले नाहीत, अशा सर्वांना स्वतः सुरक्षित ठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी, अशी नोटीस महसूल विभाग बजावणार आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली.

अर्जुना आणि कोदवली या नद्यांना पावसाळ्यामध्ये पूर येतो. त्याचा फटका काठावरील गावांना बसतो. राजापूर शहरालाही त्याचा वेढा पडतो. त्यामध्ये व्यापाऱ्यांचे नुकसान होते. गेल्या कित्येक वर्षांतील या पूरस्थितीमध्ये बदल झालेला नाही. शासनाने शहरात पूररेषा निश्‍चित केली आहे. या पूररेषेच्या आत येणाऱ्या लोकांचे कोदवली येथे मुंबई-गोवा महामार्गानजीक पुनर्वसनही केले आहे. त्यामध्ये अद्यापही काहीजण भूखंडाच्या प्रतीक्षेत आहेत. पुनर्वसन 
भागामध्ये भूखंड मिळाल्यानंतर संबंधित पूरग्रस्त लोकांनी पूररेषेआतील जागा सोडणे अपेक्षित होते; मात्र अद्यापही हे लोक त्या जागेमध्ये वास्तव्यास आहेत. 

पूरस्थिती निर्माण झाल्यास या लोकांना त्याचा सामना करावा लागतो. दोन्ही नदीपात्रांतील गाळ उपसूनही पुराचा धोका कायम आहेत, हे लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने त्यावर उपाययोजना सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून या लोकांना नोटीस बजावण्यात येणार आहे.

Web Title: konkan news Notices for people living inside the floodline