पोलिसांना पसंतीच्या ठिकाणी मिळाली बदली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

सिंधुदुर्गनगरी - पोलिस कर्मचाऱ्याला सोयीचे ठिकाण मिळाल्यास तो अधिक कार्यक्षमतेने काम करतो. ही भूमिका घेऊन पोलिस अधीक्षक दीिक्षतकुमार गेडाम यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदली करण्याचा निर्णय घेतला. सर्व बदलीपात्र कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलून घेत त्यांच्याशी पसंतीच्या ठिकाणांबाबत चर्चा करून पसंतीच्या बदल्या केल्याने पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

पोलिस ठाणे, शाखांत कार्यकाळ पूर्ण केलेल्या बदलीपात्र व बदलीकरिता विनंती अर्ज दिलेल्या एकूण १५० कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलाविले होते. 

कार्यालयाच्या सभागृहात पोलिस अधिक्षक सिंधुदुर्ग यांनी बदलीपात्र सर्व पोलिस कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. पोलिस ठाणे व शाखानिहाय शिल्लक जागांची माहिती देऊन त्यांना कोठे बदली हवी आहे, अशी विचारणी केली जात होती. प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून त्यांचे पसंतीच्या तीन ठिकाणे विचारण्यात आली. जेथे प्रथम पसंतीच्या ठिकाणी जागा शिल्लक नाही, अशा कर्मचाऱ्यांना पसंतीचे दुसरे ठिकाण नियुक्ती करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत कर्मचाऱ्यांकडून पोलिस अधिक्षकांची भेट घेण्याचे काम सुरू होते. पोलिसांची कार्यक्षमता अधिक वाढावी यासाठी बदलीचा हा पॅटर्न सुरू केला आहे.

कर्मचाऱ्याला जर सोयीच्या ठिकाणी बदली दिली तर तो अधिक व्यवस्थित काम करू शकतो. कौटुंबिक अडचणी दूर झाल्या तरच तो समाधानी राहून दुसऱ्याचे समाधान करू शकेल व पोलिस ठाण्यात येणाऱ्या व्यक्तीशी चांगला संवाद ठेवील. त्यातून पोलिस अंमलदारांकडून चांगल्या कामाची अपेक्षा पूर्ण होईल. म्हणून जास्तीत जास्त अंमलदारांना पसंतीच्या ठिकाणी बदली देण्यात आलेली आहे. अपवादात्मक परिस्थितीत जे निकष पूर्ण करू शकले नाहीत अशा कर्मचाऱ्यांचे पसंतीसाठी दुसरे ठिकाण विचारात घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील वार्षिक बदल्यानुसार प्रशासकीय व विनंती बदल्यांबाबत सर्व पोलिस कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: konkan news police transfer