रस्त्यासाठी ग्रामस्थांनी केले प्रजासत्ताकदिनी उपोषण

road
road

साडवली : देवरुख नगरपंचायत हद्दीत एक किमी अंतरावर असणार्‍या मांडवकरवाडी, धनगरवाडी कडे जाण्यासाठी अधिकृत रस्ता नाही. पाचवी पिढी रस्त्यासाठी प्रजासत्ताकदिनी देवरुख नगरपंचायतीसमोर उपोषणाला बसली.
६९ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना, संविधानाने हक्क आणि अधिकार दिले.

माणुस राजा झाला अशी वाक्ये सोशल मिडीयावराफिरत असताना देवरुख मांडवकरवाडी, धनगरवाडीतील पन्नास लोक वाडीत जाण्यासाठी हक्काचा रस्ता मागत आहेत तो त्यांना मिळत नाही यासाठी उन्हात नगरपंचायतीसमोर बसत आहेत. ही स्वतंञ भारताची वस्तुस्थिती देवरुखमध्ये पहायला मिळत आहे.

सिताराम बावधने,संगिता बावधने,सोनाली बावधने,स्वप्नाली बावधने,गंगाराम मांडवकर,सिताराम मांडवकर,सुरेश पर्शराम आदींसह पन्नास लोंकांनी आपण उपोषणाला बसणार आहोत असे नगरपंचायत मुख्याधिकारी, देवरुख पोलीस स्टेशन, तहसीलदार यांना निवेदन देवून कळवले होते. या रस्त्याबाबत वारंवार निवेदने देवून झाली आहेत.पाणीपट्टी,घरपट्टी,वीजबीले,भरली जात आहेत माञ आम्हांला साधा हक्काचा रस्ता मिळत नाही ,हा रस्ता मिळावा अशी साधी सरळ रास्त मागणी मांडवकरवाडी,धनगरवाडीकरत आहे.

प्रजासत्ताकदिनी उपोषण करु नये यासाठी नगरपंचायत विकास आराखडा तयार झाला की प्राधान्याने हा रस्ता करु असे उत्तर मुख्याधिकारी यांनी या वाडीतील ग्रामस्थांना लेखी दिलेले आहे. यामध्ये या आधी नगरपंचायत, नगरसेवक, ग्रामस्थ  यांच्या बैठका झाल्या त्यावेळी रस्त्यासाठी जमिन देणारे काही जमिनदार उपस्थित नव्हते व जे होते त्यातील काहींनी जमिन देण्यास संमती दिली नाही असे प्रकार घडल्याचे निवेदनाच्या उत्तरात मुख्याधिकामुख्याधिकारी यांनी नमुद केलेले आहे.तरीही या उत्तरावर श्रमाधान न झाल्याने मांडवकरवाडी,धनगरवाडीने उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

देवरुख नगरपंचायतीसमोर६९ वा प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण होत असताना तिरंगा डौलाने फडकत असताना न्याय हक्कासाठी बायाबापडी उपोषणाला बसलेली दिसली. वंदे मातरम, भारतमाता की जय हे शब्द या लोकांना ऐकुच गेले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com