प्रत्येक ‘खळ्या’पर्यंत पोचून ‘फुटी’ चहा प्या - राजन तेली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

सावंतवाडी - आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घ्यायच्या आहेत. त्यामुळे पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या संवाद यात्रेच्या निमित्ताने तळागाळातील लोकांच्या खळ्यापर्यंत चला आणि त्यांच्या घरातील फुटी चहा प्या, असे आवाहन भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केले. 

सावंतवाडी - आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घ्यायच्या आहेत. त्यामुळे पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या संवाद यात्रेच्या निमित्ताने तळागाळातील लोकांच्या खळ्यापर्यंत चला आणि त्यांच्या घरातील फुटी चहा प्या, असे आवाहन भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केले. 

दरम्यान, पक्षाच्या या कार्यासाठी जीवनातील फक्त पंधरा दिवस द्या; परंतु या यात्रेत जे कोणी सामील होणार नाहीत त्यांनी राजीनाम्याची तयारी ठेवा, असे ही यावेळी श्री. तेली यांनी सांगितले. प्रदेश भाजपकडून शिवार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकांच्या शेतात अंगणात जाऊन पक्षाच्या ध्येयधोरणे उपक्रम समजावून सांगितले जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक पदाधिकाऱ्यांना पंधरा दिवस गावात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर आज तालुक्‍यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा आज येथे मेळावा घेण्यात आला. यावेळी श्री. तेली बोलत होते. यावेळी नगरसेवक मनोज नाईक, उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, महेश सारंग, चद्रकांत जाधव, परिणीता वर्तक, संजू शिरोडकर, निशांत तोरसकर आदी उपस्थित होते. 

यावेळी चौकुळ, माडखोल, कारिवडे, सांगेली आदी भागातील काँग्रेस तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी श्री. तेली म्हणाले, ‘‘या ठिकाणी भविष्यात भाजपाचे सरकार येणार आहे. त्या दृष्टीने येथील लोकांनी कामाला लागणे गरजेचे आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपा असले तरी जिल्ह्यात मात्र आपल्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत अत्यंत कमी मताने काही उमेदवारांना पराभव सहन करावा लागला ही वस्तूस्थिती आहे; मात्र भविष्यात याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या. तसेच शासनाकडुन राबविण्यात आलेले उपक्रम गावागावात पोहोचवा लोकांना शासकीय योजनांची माहीती द्या.’’ 

श्री. तेली म्हणाले, ‘‘भाजपकडून संवाद यात्रा राबविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यात अनेक मोठे नेते येणार आहेत. त्यांना घेवुन लोकांच्या खळ्यापर्यत जा त्यांच्याच घरी जेवण करा, फुटी चहा प्या, आम्ही  सुध्दा तुमच्यातलेच आहोत असे त्यांना वाटल्यानंतर ते निश्‍चितच तुमच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील यात काही शंका नाही.’’ 

ते पुढे म्हणाले, ‘‘वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही संवाद यांत्रा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर तालुका स्तरावर काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनीधींनी या यात्रेत समाविष्ट होवून पंधरा दिवस नेमण्यात आलेल्या गावात काम करणे बंधनकारक राहणार आहे. यात महीलांना वगळण्यात आले आहे; परंतु यात कोणी वेळकाढू भूमिका घेतल्यास त्याचे राजीनामे घेण्यात येणार आहेत.’’ 

मुख्यमंत्री अथवा प्रदेशाध्यक्ष येणार 
या वेळी श्री. तेली म्हणाले, ‘‘संवाद यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे येणार आहेत. या ठिकाणची जबाबदारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह आमदार साटम यांच्याकडे दिली आहे.’’

Web Title: konkan news rajan teli evocation