भिरभिरत्या फुलपाखरांच्या उद्यानांनी वैभवात भर

राजेंद्र बाईत
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

राजापूर - फुलाफुलांवरून घिरट्या घालत फिरणारी रंगबिरंगी पंखांची सुंदर फुलपाखरे पाहण्याची संधी राजापूरकरांना फुलपाखरू उद्यानामुळे मिळणार आहे. तालुक्‍यातील अणसुरे, सोलगाव आणि ओणी या तीन तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, करंजी या दोन ठिकाणी फुलपाखरू उद्याने उभारली जाणार आहेत. येथील पर्यटनालाही त्याचा उपयोग होईल.

राजापूर - फुलाफुलांवरून घिरट्या घालत फिरणारी रंगबिरंगी पंखांची सुंदर फुलपाखरे पाहण्याची संधी राजापूरकरांना फुलपाखरू उद्यानामुळे मिळणार आहे. तालुक्‍यातील अणसुरे, सोलगाव आणि ओणी या तीन तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, करंजी या दोन ठिकाणी फुलपाखरू उद्याने उभारली जाणार आहेत. येथील पर्यटनालाही त्याचा उपयोग होईल.

अणसुरे येथील श्री सिद्धिविनायक विद्यामंदिरच्या प्रांगणात एका उद्यानाची उभारणी केली. झाडांची लागवड झाली. फुलांमधील मध गोळा करण्यासाठी काही झाडांवर फुलपाखरू जाते, तर काही झाडांवर अंडी घालण्यासह त्यांची जीवनसाखळी असते. काही झाडे खाद्य म्हणून वापरतात. स्थानिक पातळीवरील झाडांचा अभ्यास करून उद्यानात झाडे लावली आहेत, अशी माहिती या प्रकल्पात पुढाकार असलेल्या पर्यावरण सेवा योजना विभागाचे प्रकल्पाधिकारी दिनेश वाघमारे यांनी दिली.

फुलपाखरांसह निसर्गातील जैवविविधततेबाबत जाणीव-जागृती निर्माण व्हावी, ती वाढावी हेही उद्देश ही उद्याने उभारण्यामागे आहेत. उद्यानांमध्ये लागवड केलेली झाडे पर्यावरण सेवा योजना विभागानेच उपलब्ध करून दिली आहेत. काही प्रजातींच्या रोपांची रुजवात रोपवाटिकांमध्ये सुरू आहे.

उद्यानातील वनस्पती
फुलपाखरू उद्यानात सोनचाफा, सोनटक्का, बहावा, कृष्णकमळ, उलटा अशोक, सीताफळ, पानफुटी, बदकवेल, हळदीकुंकू, अशोक, बोगनवेल, कढीपत्ता यापैकी काही झाडे लावण्यात आली, तर काही भविष्यात लावण्यात येतील.

जीवनक्रम अभ्यासण्याची संधी
फुलपाखरे विशिष्ट झाडांवर अंडी घालून कोष करतात. तेथे त्यांचा जीवनक्रम फुलतो. फुलपाखरे कोणती झाडे निवडतात याचा अभ्यास करून उद्यानात झाडे निवडली आहेत. अंडी घालण्यापासून त्याचा कोष तयार होणे कोषातून अळी बाहेर येणे, त्याचे फुलपाखरू होणे आणि त्यानंतर पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू हे चित्रात नव्हे, तर प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: konkan news rajapur Butterfly