‘कोरीनॲन्ड्रा इलिगन्स’ फूलझाडाचा शोध

राजेंद्र बाईत
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

राजापूर - राजापूर तालुक्‍यात पावसाळ्यात डबक्‍यामध्ये उगवणाऱ्या ‘कोरीनॲन्ड्रा इलिगन्स चांदोरे, यू. एस. यादव ॲन्ड एस. आर. यादव’ या नव्या फूलझाडाचा शोध लावण्याची कामगिरी येथील डॉ. अरुण चांदोरे व डॉ. एस. आर. यादव, डॉ. उषा यादव या तिघांनी केली आहे. दोन वर्षांच्या अथक परिश्रमाने त्यांनी हा शोध लावला. साखरकोंबे परिसरामध्ये या फूलझाडाचा आढळ आहे. यामुळे कमी उंचीच्या कातळ परिसरामध्ये दुर्मिळ वनस्पतींचा खजिना असल्याचे अधोरेखित झाले आहे.

हे फूलझाड तालुक्‍यातील साखरकोंबे, जैतापूर, नाटे परिसरापासून ते थेट देवगड तालुक्‍यापर्यंत आढळली. रयत शिक्षण संस्थेच्या आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. चांदोरे, शिवाजी विद्यापीठातील वनस्पती विभागातील शास्त्रज्ञ प्रा. डॉ. श्री. यादव आणि सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयाच्या श्रीमती यादव यांना कातळावर हे फूलझाड आढळले. त्याची माहिती न मिळाल्याने त्याच्या संशोधनाचा ध्यास त्यांनी घेतला. या संशोधनामध्ये सहकारी शिक्षकांसह विद्यार्थ्यांचेही सहकार्य या तिघांना लाभले.

संशोधित नव्या फूलझाडाची अशी नोंद
सदाबहार आणि लक्ष वेधून घेणाऱ्या ‘कोरीअनॲन्ड्रा इलिगन्स’ या फूलझाडाचा  संशोधित वनस्पती म्हणून जागतिक स्तरावर ९ मे, २०१६ ला न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या ‘फायटोटॅक्‍सा’ या जागतिक दर्जाच्या या नियतकालिकाने नोंद केली आहे. त्या नियतकालिकाच्या मुखपृष्ठासह वेबसाइटवर फुलाची छबी आहे. नव्या संशोधित वनस्पतींचा समावेश असलेल्या देशातील ‘बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया’या पुस्तकामध्येही संशोधित नवी वनस्पती म्हणून नोंद झाली आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरही ५ जून २०१७ रोजी त्याची छबी छापून आली आहे.

Web Title: konkan news rajapur flower

टॅग्स