लेटलतिफ शिक्षकांना धडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

रत्नागिरी - शाळेमध्ये वेळेवर न येणाऱ्या दोन शिक्षकांना त्या दिवशी रजा मांडण्यास सांगून सभापती सुभाष गुरव यांनी शिक्षकांनाच धडा शिकवला आहे. शैक्षणिक कामामध्ये चुकारपणा, शाळेत वेळेत न येणे अशा तक्रारी शिक्षकांविरुद्ध वारंवार ग्रामस्थ व पालक करीत आहेत. गेले काही महिने पंचायत समितीच्या सभेमध्ये हा विषय चांगलाच गाजत आहे.

तालुक्‍यातील कुवेशी येथील शाळेमध्ये दोन शिक्षक वेळेवर आले नाहीत. सभापतींच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी दोन शिक्षकांची त्या दिवशीची रजा मांडण्याचे फर्मान काढले. संबंधित शिक्षकांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. त्यामुळे लेटलतिफ शिक्षकांना दणका मिळाला आहे.

श्री. गुरव यांची निवड झाल्यानंतर पहिलीच आढावा बैठक शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारावरून गाजली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सदस्यांच्या प्रश्‍नांना समर्पक उत्तरेही देता आली नव्हती. त्यामुळे तालुक्‍यातील शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी शाळांना, शिक्षकांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी श्री. गुरव यांनी आठवड्यातून एक दिवस तालुक्‍यातील विविध शाळांना भेटी देणे सुरू केले. कुवेशी येथील जिल्हा परिषद शाळा नं. १ ला त्यांनी भेट दिली. तेव्हा दोन शिक्षक वेळेत उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्या शिक्षकांना तोंडी समज देऊन सुधारणा करण्यास सांगितले. यावेळी केलेल्या चौकशीत या शिक्षकांच्या विरोधात ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव संमत करून त्यांच्या बदलीची मागणी केल्याची आढळून आले. श्री. गुरव यांनी दोन दिवसांपूर्वी पुन्हा या शाळेला अचानक भेट दिली. त्यावेळीही हे दोन्ही शिक्षक उशिराच आले. त्यावर श्री. गुरव यांनी त्यादिवशीची त्यांची रजा मांडली. या वेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी मुरलीधर वाघाटे, कुवेशीच्या सरपंच सौ. बहिरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपस्थित होते.

Web Title: konkan news ratnagiri teacher