भात पेरणी कासवगतीने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

अलिबाग - मॉन्सूनची चाहूल लागली असली तरी रायगड जिल्ह्यात अजून पेरणीच्या कामांनी वेग घेतला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या दोन हजार हेक्‍टरवरच भात पेरणी झाली आहे. बहुसंख्य शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत असून त्यानंतरच या कामाला वेगाने सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यात या वर्षी खरीप हंगामात एक लाख २५ हजार ६०० हेक्‍टर क्षेत्रावर विविध पिके घेण्यात येणार आहेत. त्यापैकी तब्बल एक लाख २५ हजार १०० हेक्‍टर क्षेत्रावर भाताचे पीक घेण्यात येणार आहे. या क्षेत्रापैकी अवघ्या दोन हजार ३६ हेक्‍टरवर भात पेरणी करण्यात आली आहे. अलिबाग तालुक्‍यात २३३, महाड १००, पेण ३८६, माणगाव १२७, तळा ५०, रोहा १००, सुधागड (पाली) ६०, महाड ६५५, पोलादपूर २५०, म्हसळा ४०; तर श्रीवर्धन ३५ हेक्‍टर क्षेत्रावर भातपेरणी झाली आहे; तर नागली, वरई, तूर, तीळ, कारळा तेलबियांची अद्यापही पेरणी झाली नाही, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने दिली.

बियाणे आणि खतपुरवठा करणार
रायगड जिल्ह्यात आठ हजार ९४२ क्विंटल भातबियाण्यांची मागणी आहे. आतापर्यंत आठ हजार ३५० क्विंटल बियाण्यांचा जिल्ह्याला पुरवठा झाला आहे. खरीप हंगामासाठी यूरिया २१ हजार, डीएसी १४००, एमओपी ९००, एसएसपी ११००, १०:२६:२६- १००, १५:१५:१५- २५०० अशी २७ हजार मे. टन खतांची मागणी केली होती. ३१ मेपर्यंत जिल्ह्याला फक्त दोन हजार ५०६ मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत अलिबाग २५०, खालापूर २०, कर्जत ४५, पाली १००, पेण १८९; तर रोहा तालुक्‍यात ४५ मे. टन खताचा पुरवठा झाला आहे.

Web Title: konkan news Rice sowing