कणकवलीत रस्ते धोकादायक स्थितीत 

कणकवलीत रस्ते धोकादायक स्थितीत 

कणकवली - सरकार बदलले; पण धोरणे मात्र जुनीच आहेत, अशी अवस्था कणकवली तालुक्‍यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था पाहिल्यावर स्पष्ट होते. रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता अशी आहे. शहरातील आचरा रस्त्याबाबत सत्ताधारी आरडाआेरडा करीत असले तरी गावागावातील रस्त्याची स्थिती काही वेगळी नाही. कणकवली शहराला जोडणारे कनेडी पंचक्रोशी असो वा सातरल, कासरल, वरवडे, बिडवाडी असो, सगळ्याच रस्त्याची परिस्थिती ही नागरिकांना जीव टांगणीला ठेवून चालावी  अशीच आहे.  

प्रमुख शहरांसह महामार्गांवरील रस्त्यांची अवस्था देखील बिकट झाली आहे. रस्ते बांधकामानंतर एक पाऊस देखील रस्ते पेलू शकले नसल्याचे यंदा दिसून आले. रस्त्यांची बिकट अवस्था राज्यात चांगले कंत्राटदार नसल्यामुळे झाली असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. राज्यातील हजारो किलोमीटरचे रस्ते नव्याने करण्याची गरज असल्याची माहिती नुकतीच बांधकाम मंत्री श्री. पाटील यांनी विधीमंडळात दिली. तसेच पावसाळ्यानंतर महिन्याभरात टिकाऊ रस्ते बांधणीच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. केंद्र सरकारने राज्यातील १२ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यास तसेच ६७ हजार कोटी रुपये किमतीच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण केली जाणार असून, खड्डेमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होणार असल्याची माहिती यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. शहरांचा विकास हा रस्त्यांवर अवलंबून असतो. रस्त्यांवरून होणारी वाहतूक ही सुरळीत आणि जास्त वेगाने होणे गरजेचे आहे. सध्या राज्यातील रस्त्यांची अवस्था ही विकासाची गती कमी करणारी आहे. केंद्राच्या मदतीने राज्यातील रस्ते बांधणीमध्ये मजबूती देण्याचे आश्वासन पुर्ण करण्यासाठी राज्यातील सरकार काय करणार हे येत्या काळात स्पस्ट होणार आहे.

मात्र कोकणात गेले दोन महिने मुसळधार पाऊस आहे. अजूनही पावसाचे दिवस असून येत्या काळात कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सवाचा सण येत आहे. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक चाकरमनी कोकणातील आपल्या गावी येणार आहेत. येण्यासाठी त्यांना रेल्वेची सुवीधा असली तरी तालुक्‍यातून गावाकडे जाण्यासाठी रस्ते वाहतूक हा एकच पर्याय आहे. येत्या काळत वाहतूही कित्येक पट्टीने वाढणार आहे. येणाऱ्या भावीकांचे स्वागत मात्र यंदा रस्त्यावरी खड्डयांनी होणार हे निच्छित आहे. गावातील एकही रस्ता यंदा चांगल्या स्थितीत नाही. कणकवली शहरा लगतच्या आचरे रस्त्याची दैयनीय अवस्था पाहता गावातील रस्त्यांना विचारतय कोण अशी स्थितीती आहे. सरकारच्या या कारभारा विरोधात रस्त्यावर उतरनारे विरोधक केवळ गप्प आहेत. काँग्रेसची भूमीका काही कळेनासी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असून नसल्यासारखी आहे. त्यामुळे रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे नाटक शिवसेने कार्यकर्तेत सरकारमध्ये असूनही करत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यातीही तीच भूमीका आहे. मग सरकार असून सत्ताधारी अधिकाऱ्यांना जाब विचारत असतील तर त्यांचे पालकमंत्री, मंत्री आणि मुख्यमंत्री यांची जबादारी तरी काय असा प्रश्‍न प्रत्येक नागरिकाला पडलेला आहे.  

महामार्गाची अवस्थाही तीच
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग जीवघेणा असताना ग्रामीण भागातील रस्तेही त्याच अवस्थेचे असल्याने नव्याने सत्ता हाती दिलेल्या भाजप सरकारकडून जनतेने नेमक्‍या काय अपेक्षा ठेवाव्यात, सरकार बदलून आता तीन वर्षे लोटली तरी जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांना मार्ग मिळत नसले तर जनतेने काय करावे, असा प्रश्‍न आहे. कणकवली तालुक्‍यातील कासार्डे हे सर्वात मोठे गाव आहे. या गावातून पियाळी, वाघेरी मार्गे फोंडा किंवा गडमठ मार्गे फोंडा येथे जाणारा रस्ता वाहतुकीस धोकादायक आहे. असे तालुक्‍यातील अनेक रस्ते यंदा धोकादायक झाले आहेत. अजून पावसाळा संपलेला नाही. पुढच्या कालावधीत या रस्त्यांची स्थिती अजूनही बिकट होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com