पै पै जमवून सणासाठी हात खुला 

भूषण आरोसकर
रविवार, 27 ऑगस्ट 2017

सावंतवाडी - तो पिकवतो व दुकान थाटून विक्रीस उभा राहतो. कोण तरी एखादा मुंबईकर येणार किंवा कोण्या पर्यटकाची गाडी त्याच्या जवळ येवून थांबणार. त्याने पिकवलेला चिबूड, काकडी, दोडकी, घेतो. यातुन मिळणार ते किती रुपये मात्र गरीबी असली तरी चतुर्थीच्या सणात खर्च करणार तेही श्रीमंत मनाने. मळगावात स्टॉल लावणाऱ्या शेतकऱ्यांसारखी जिल्ह्यातील सगळ्याच बळीराजांची कथा आहे. गणेशोत्सवानिमित्त ती पुन्हा एकदा ठळक झाली. 

सावंतवाडी - तो पिकवतो व दुकान थाटून विक्रीस उभा राहतो. कोण तरी एखादा मुंबईकर येणार किंवा कोण्या पर्यटकाची गाडी त्याच्या जवळ येवून थांबणार. त्याने पिकवलेला चिबूड, काकडी, दोडकी, घेतो. यातुन मिळणार ते किती रुपये मात्र गरीबी असली तरी चतुर्थीच्या सणात खर्च करणार तेही श्रीमंत मनाने. मळगावात स्टॉल लावणाऱ्या शेतकऱ्यांसारखी जिल्ह्यातील सगळ्याच बळीराजांची कथा आहे. गणेशोत्सवानिमित्त ती पुन्हा एकदा ठळक झाली. 

कोकणातील शेतकऱ्याची मोठी संपत्ती म्हणजे त्याची शेती. शेतीत गुजराण करुन मोठ्या मनाने खर्चाचा ताळमेळ व बचत करुन संसाराचा गाडा हाकणे हा जणू त्याचा स्वभावगुण. शेतीचे पिक चांगले यावे यासाठी परमेश्‍वराजवळ प्रार्थना करीत दिवस जातात तोपर्यत श्रावण संपला. तोंडावर असलेल्या चतुर्थीला पैशाची पुंजी जमा कशी करावी याची चिंता त्याला आषाढापासूनच असते. पोटापुरते पैसे नसलेला हा शेतकरी वर्ग मच्छी माशांची खुप आवड असतानाही मुद्दामहून श्रावण धरतो. कारण पैसे वाचवून त्याची बचत चतुर्थीला फायद्याची होईल या कारणामुळे. असा हा कोकणचा शेतकरी शेतीजवळच कष्टाने परस बाग निर्माण करतो. त्यात घेतलेली फळभाज्याच्या उत्पन्नातून चतुर्थीसाठी लागणारी पुंजी गोळा करतो. कारण शेतीचे उत्पन्न हे दिवाळीला मिळते तर परसबागेत पिकविलेले चिबुड, दोडकी, काकडी, वांगी या फळभाज्या विकून मिळलेले उत्पन्न चतुर्थीला सणाला खर्च करण्यासाठी मिळते. हे दरवर्षीचेच चित्र आहे. कोकणात आल्यावर कोणी एसटी स्थानकाकडे, तर कोणी रेल्वे स्टेशनकडे, कोणी चौकात, तर कोणी आठवड्या बाजारात एखादा शेतकरी, एखादा म्हातारी, तर एखादा शेतकरी चिबुड, काकडी, दोडका हातात घेवून विक्रीस बसलेला दिसून येतोच. त्यातून चार पैसे मिळण्याच्या हेतूने चतुर्थी सणाचा खर्चास थोडी मिळत असते याची जाणिव ठेवून. जिल्ह्यात यंदा पाऊस पुरेसा व वेळेवर पडल्याने भातशेती बरोबरच फळभाजी व भाजीपाला पिकही चांगलेच बहरली आहे. तालुक्‍यात आतापर्यंत साडेसात हजार हेक्‍टर क्षेत्रावर भातशेती लागवड पुर्ण झाली आहे. 

यंदाचा पुरेसा पाऊस भातशेतीस चांगलाच अनुकूल ठरला आहे. आतापर्यंत झालेल्या पावसाने जवळपास 86 गावपाड्यात शेतकऱ्याकडून साडे सात हजार हेक्‍टर क्षेत्रावर भातशेती लागवड करण्यात आलेली आहे. चतुर्थी सणाला सद्यस्थितीत बहरलेली भातशेती चांगलीच वर आलेली असून डोलू लागली आहे. बरेच शेतकरी वर्गाने परसबागेत पिकविलेल्या फळभाज्या व भाजीपाला घेवून दुकानेही लावली आहेत. त्यातूनही यंदा उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहेत. चार पैसे मिळविण्यासाठी या शेतकऱ्याने सणाच्या चार दिवस उन्हा पावसात भर गर्दीत शहरातील बाजारपेठेत ठाण मांडून बसला होता. गणेशोत्सव काळाचा अंदाज घेता स्थानिक विक्रेते गाव बाजारपेठेत हा भाजीपाला घेवून विक्रीसाठी येत आहे. अनेकांना यातून गणेशोत्सव काळासाठी हातालाही थोडी आर्थिक मदत होत आहे. 

बाप्पाला साकडे 
फळभाजी व भाजीपालातून मिळणारे उत्पन्न बाप्पाच्या उत्सवासाठी मदत करणारे ठरत असते; मात्र शेतकऱ्याला खरे उत्पन्न त्याने पिकविलेल्या भातशेतीतून मिळते. भातशेतीसमोर अनेक संकटे उभी असतात. घेतलेली मेहनत फुकट जावू नये यासाठी आलेल्या बाप्पासमोर हा शेतकरीवर्ग मोठ्या भक्तीभावाने साकडे घालत आहे. 

Web Title: konkan news sawantwadi