शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक शाळांची पाटी कोरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

अंतिम निकाल जूनला - नव्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ
कणकवली - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे यंदा पाचवी आणि आठव्या इयत्तेसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. याचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. यात अनेक शाळांच्या निकालाची पाटी कोरीच राहिली आहे. चुकीचे प्रश्‍न, प्रश्‍नपत्रिकेचे बदललेले स्वरूप आणि उशिरा आलेली पुस्तके यामुळे अत्यंत कमी निकाल लागल्याची टीका पालक आणि शिक्षकांतून होत आहे.

कोकण बोर्ड स्थापन झाल्यानंतर गेली पाच वर्षे दहावी-बारावी निकालात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल आहे. दरवर्षी दहावी-बारावीचा निकाल ९५ टक्‍क्‍यांच्या पुढे लागत आहे. चौथी-सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतही जिल्ह्याचा निकाल अव्वल होता. मात्र यंदापासून नवी रचना अंमलात आणल्याने निकालाचा टक्‍का घसरला आहे. राज्यात पाचवीचा निकाल २१.४३ टक्‍के तर आठवीचा निकाल १३.४५ टक्‍के लागला. जिल्ह्याच्या निकालाची सरासरीही तेवढीच असल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांनीही परीक्षा पद्धतीवर शंका उपस्थित केली आहे. दरम्यान शिष्यवृत्ती निकालाबाबत, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे हरकती घेण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. जून महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे.

पर्याय निवडताना घोळ
यापूर्वी चौथी आणि सातवीची इयत्तेसाठी प्रत्येकी तीन विषयांची ३०० गुणांची परीक्षा घेतली जात होती. यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शहरी आणि ग्रामीण रचनेच्या कोट्यानुसार शिष्यवृत्ती दिली जात होती. गतवर्षीपासून परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले. दोन विषयांसाठी ३०० गुणांची परीक्षा यंदा घेण्यात आली. यामध्ये सोप्या आणि कठीण स्वरूपाचे प्रत्येकी ३० टक्‍के तर मध्यम स्वरूपाचे ४० टक्‍के प्रश्‍न विचारले. प्रत्येक प्रश्‍नाला चार पर्याय निवडण्यात आले. यातील दोन पर्याय अचूक होते. यातील एक पर्याय विद्यार्थ्यांनी निवडायचा होता. हा पर्याय निवडताना विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. तर काठिण्य पातळी अधिक राहिल्याने विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था राहिली. यात राज्यासह कोकणचा शिष्यवृत्ती निकाल १५ ते २५ टक्‍के एवढा नीचांकी पातळीवर आल्याची प्रतिक्रिया शिक्षकांमधून व्यक्‍त होत आहे.

Web Title: konkan news scholarship exam result