सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाचे वेध...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाची पूर्वतयारी जोरदार सुरू झाली आहे. गणेश मूर्तिकार तबला-मृदुंग बनविण्याच्या कामांना जोर चढला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, भजने मंडळे यांच्या नियोजनाच्या बैठका रंगू लागल्या आहेत.

जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी गणेशोत्सव २५ ऑगस्टपासून सुरू होत असून गणपतीच्या शाळांमध्ये मूर्तिकारांची धावपळ सुरू झाली आहे तर भजनी मंडळेही भजनाचे साहित्याची दुरुस्ती करण्यासाठी धावपळ करू लागले आहेत. जिल्ह्यात मृदुंग, तबला साहित्य दुरुस्ती दुकानांमध्ये मृदुंगाचे नाद घुमू  लागला आहे.जिल्ह्यातील दशावतार कलांबरोबरच भजनी कलाही नावारूपाला येत आहे. गावागावांत विविध भजनी मंडळे तयार झाली आहेत. गणेशोत्सव कालावधीत जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण होते. घराघरांत आरती, भजने असे कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी भजनी मंडळांची आतापासूनच पूर्वतयारी सुरू झाली असून भजनासाठी आवश्‍यक पेटी, मृदुंग, तबला, डगा, ढोलकी अशा साहित्याची दुरुस्तीच्या कामांना जिल्ह्यात जोर चढला आहे. जिल्ह्यातील स्थानिक आणि जिल्ह्याबाहेरून येणारे कारागीर या कामात गुंतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी मृदुंगाची धुम वाजू लागली आहे. गणपतीच्या आगमनाची चाहूल ऐकू येऊ लागली आहे.

Web Title: konkan news sindhudurg ganeshotsav