१०० टक्के मिळवणारी  मुक्ताई बुद्धिबळपटूही !

राजेंद्र बाईत
बुधवार, 14 जून 2017

राजापूर - तालुक्‍यातील जानशी येथील साने गुरुजी विद्यामंदिरच्या मुक्ताई मिलिंद देसाई हिने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवले. वयाच्या बाराव्या वर्षी फिडे मानांकनही मिळवून तिने बुद्धिबळातील चमक दाखवली आहे. मिठगवाणे व जानशीमधील प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले. कोणत्याही क्‍लासला न जाता आई-वडील, शिक्षक यांच्या मार्गदर्शनाला नियमित अभ्यासाची जोड देत तिने हे यश मिळवले.

होमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रौप्यपदक, सातवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत ग्रामीण भागातून राज्यात पाचवी, पाचवीच्या एमटीएस परीक्षेत राज्यात चौथी, तर, केटीएस परीक्षेमध्ये प्रज्ञावान विद्यार्थिनी पुरस्कार तिने पटकाविला आहे. मिठगवाणेसारख्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षणाचे व जानशीत माध्यमिक शिक्षण घेताना तिने नवा मानदंड प्रस्थापित केला. डोंगर (ता. राजापूर) येथील विद्यार्थिनी मैत्रेयी रजपूत ही शिष्यवृत्तीला राज्यात पहिली आली होती. उच्च शिक्षणातही तिने सी. ए. परीक्षेत झेंडा रोवला. तिच्या पावलावर मुक्ताईने पाऊल ठेवले आहे.

Web Title: konkan news ssc result muktai desai