एस.टी. संप: चिखली आगारातील बसेस पुर्णपणे बंद

संजय खेडेकर
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

खासगी वाहतुकदारांची चांदी....
महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी मंगळवार (ता.17) पासुन संप सुरु केल्याने चिखली आगारातील संपुर्ण बस वाहतुक बंद आहे. यामुळे प्रवाश्यांची ने-आण करणार्‍या खासगी वाहतुकदारांची चांदी झाली असल्याचे दिसुन येते. आसपास 50 कि.मी.च्या परीसरामध्ये प्रवाश्यांची खासगी वाहतुक करणार्‍या काळीपिवळी सह मिनीडोअर, अ‍ॅपे व इतर खासगी वाहतुकदारांना आजच्या दिवशी बर्‍यापैकी प्रवाशी मिळत असल्याचे दिसुन येते आहे, मात्र दुरचा प्रवास करणार्‍या प्रवाश्यांना इतर कोणताही पर्याय नसल्याने त्यांची मात्र हेळसांड होत आहे.

चिखली - वेतनवाढीच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळातील कर्मचार्‍यांच्या सर्वच संघटनांनी एकत्रितपणे संप पुकारल्याने एैन दिवाळीच्या दिवसामध्ये प्रवाश्यांसह नागरीकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. राज्यभर सुरु असलेल्या या एस.टी. कर्मचार्‍यांच्या संपाचा परीणाम चिखली शहरातील आगारातही दिसुन आला असुन कायम वर्दळीचा आणि गजबजलेला असलेल्या या परीसरामध्ये मंगळवारी (ता.17)भल्या पहाटेपासुन शुकशुकाट दिसुन येत होता.

वेतनवाढीच्या मुळ मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या वाहक, चालक आणि तांत्रिक कर्मचार्‍यांसह सर्वच कर्मचार्‍यांनी मंगळवार (ता.17) पासून संपाची हाक दिली होती. सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत परीवहन महामंडळातील सर्वच संघटनांनी एकत्रितपणे संपावर कायम राहण्याचा निर्णय घेतला, आणि आज (ता.17) सकाळपासुनच राज्यभर एस.टी.ची चाके थांबली. चिखली आगारातही सकाळपासुन एकही बस बाहेर आली नाही किंवा बाहेरुनही एकही बस या आगारामध्ये आलेली नाही. कर्मचार्‍यांच्या या संपामुळे एैन दिवाळीत आपापल्या घराकडे परतणार्‍या चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असुन दिवाळीसाठी जाणार्‍या माहेरवासीनींनाही या संपाचा फटका बसणार आहे. राज्यभर व्यापक प्रमाणात सुरु असलेला हा संप किती काळ टिकतो हे सरकार या समस्येवर किती काळामध्ये तोडगा काढणार यावर अवलंबुन असल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. एकंदरीत एस.टी.कर्मचार्‍यांच्या संपामुळे एैन दिवाळीत प्रवाश्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे एवढे मात्र निश्‍चित.

खासगी वाहतुकदारांची चांदी....
महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी मंगळवार (ता.17) पासुन संप सुरु केल्याने चिखली आगारातील संपुर्ण बस वाहतुक बंद आहे. यामुळे प्रवाश्यांची ने-आण करणार्‍या खासगी वाहतुकदारांची चांदी झाली असल्याचे दिसुन येते. आसपास 50 कि.मी.च्या परीसरामध्ये प्रवाश्यांची खासगी वाहतुक करणार्‍या काळीपिवळी सह मिनीडोअर, अ‍ॅपे व इतर खासगी वाहतुकदारांना आजच्या दिवशी बर्‍यापैकी प्रवाशी मिळत असल्याचे दिसुन येते आहे, मात्र दुरचा प्रवास करणार्‍या प्रवाश्यांना इतर कोणताही पर्याय नसल्याने त्यांची मात्र हेळसांड होत आहे.

Web Title: konkan news: st strike administration diwali