सातार्ड्याबरोबरच तारकर्ली पुलालाही धोका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

वाळू उत्खननाचा परिणाम - सार्वजनिक बांधकामकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

सावंतवाडी - बेकायदा वाळू उपशामुळे सातार्डा आणि तारकर्ली पुुलांना धोका 
उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. यामुळे दोनशे मीटर परिसरातील उत्खनन रोखावे, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना आपण दिले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी आज येथे दिली.

वाळू उत्खननाचा परिणाम - सार्वजनिक बांधकामकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

सावंतवाडी - बेकायदा वाळू उपशामुळे सातार्डा आणि तारकर्ली पुुलांना धोका 
उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. यामुळे दोनशे मीटर परिसरातील उत्खनन रोखावे, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना आपण दिले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी आज येथे दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या तसेच महाराष्ट्र गोवा या सीमा जोडणाऱ्या सातार्डा पुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन होत असल्यामुळे नदीचा सुमारे पाचशे मीटरचा काठ खचला आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. याबाबत श्री. बच्चे यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. 

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेली सातार्डा आणि तारकर्ली या दोन पुलाची समस्या आहे. पुलाखाली मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन होत आहे. यामुळे ते रोखणे गरजेचे असून, परिसरातील दोनशे मीटर उत्खनन रोखावे,’’ असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

शिरोडा रेडी या पुलाच्या दुरुस्तीसाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे. गेली सात वर्षे हे काम रेंगाळले होते. विशेष बाब म्हणून मी माझ्या काळात हे काम पूूर्ण करून घेत आहे. सद्य:स्थिती लक्षात घेता काम सुरू केले आहे. त्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनीही बांधकाम विभागाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. कोळंब (ता. मालवण) येथील पुलाचाही प्रश्‍न गंभीर आहे. त्याठिकाणीही  काम मार्गी लावण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत.’’ 

ठेकेदारांना धरून आणण्याची वेळ 
या वेळी श्री. बच्चे म्हणाले, ‘‘जुन्या पुलाचे काम धोकादायक असते. यामुळे डागडुजी किंवा दुरस्तीसाठी नव्याने एजन्सी किंवा ठेकेदार येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अक्षरश: ठेकेदारांना धरून आणून काम करावे लागते.’’ 

आरोसबाग पुलाला ठेकेदार मिळेना
आरोसबाग पुलासाठी बारा कोटी रुपये मंजूर आहे; मात्र तब्बल दोन वेळा निविदा काढुन सुध्दा ते काम घेण्यासाठी कोणी ठेकेदार पुढे आलेला नाही. यामुळे ते काम पुढे ढकलल्यात जमा आहे, असे ही त्यांनी सांगितले.

Web Title: konkan news tarkarli bridge dangerous