प्राथमिक शिक्षकांनी अंगणवाडीतही शिकवायचे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

राजापूर - अंगणवाडीतील मुलांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनाही विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. आठवड्यातून एक दिवस प्राथमिक शिक्षकाने लगतच्या अंगणवाडीतील मुलांना शिकवण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढला आहे. ही नवी जबाबदारी शिक्षक कसे पेलणार हा चर्चेचा विषय आहे.

अंगणवाडीतील मुले शाळेत येतात तेव्हा ती कच्चीच असतात. यावर मात करण्यासाठी नवी उपायोजना, संकल्पना हाती घेतली आहे. प्राथमिक शिक्षकांना अंगणवाडीतील मुलांवरही लक्ष द्यावे लागणार आहे. शाळेच्या परिसरातील अंगणवाडीला आठवड्यातून किमान एकदा जाणे अनिवार्य आहे. अंगणवाडीतील मुले पहिलीसाठी पात्र ठरावीत म्हणून पुणे येथील ‘विद्या प्राधिकरण’ संस्थेने ‘आकार’ अभ्यासक्रम विकसित केला.  तो प्राथमिक शिक्षकांनी अंगणवाडी सेविकांना शिकवायचा आहे. शाळांतील विविध सण, उत्सवातही अंगणवाडीतील मुलांना सहभागी करून घ्यावयाचे आहे. ही नवी जबाबदारी स्वीकारण्यास शिक्षकांचा विरोध होण्याच शक्‍यता आहे. 

शिक्षकांवर अध्यापनची जबाबदारी पार पाडताना अन्य अशैक्षणिक कामे करावी लागतात. अशा स्थितीत अंगणवाडीतील मुलांना शिकवण्याची, त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आधीच शैक्षणिक कामांची जबाबदारी असताना ही नवी जबाबदारी कशासाठी?
- प्रकाश पाध्ये, जिल्हा सरचिटणीस, पुरोगामी शिक्षक संघटना

Web Title: konkan news teacher anganwadi rajapur