अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्‍न ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

कणकवली - शिक्षण हक्क कायद्यानुसार मुख्याध्यापकांच्या ऐवजी समायोजन करण्यात येणाऱ्या तालुक्‍यातील ५१ उपशिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. आजच हरकती नोंदवून उद्या (ता. ३) शिक्षकांचे समायोजन करण्याचा आदेश वरिष्ठ पातळीवरून निघाल्याने बदलीस पात्र ठरलेल्या शिक्षक, संघटनांचे प्रतिनिधी आणि बीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तसेच लोकप्रतिनिधींमध्ये आज चांगलीच जुंपली होती. आता नव्या निकषानुसार १० पटसंख्या असलेल्या शाळेत एकच शिक्षक देण्याच्या सूचना आल्याने तालुक्‍यातील ५१ पैकी ४३ शिक्षकांचे समायोजन झाले तर उर्वरित ८ शिक्षकांचा प्रश्‍न कसा निकाली लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

कणकवली - शिक्षण हक्क कायद्यानुसार मुख्याध्यापकांच्या ऐवजी समायोजन करण्यात येणाऱ्या तालुक्‍यातील ५१ उपशिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. आजच हरकती नोंदवून उद्या (ता. ३) शिक्षकांचे समायोजन करण्याचा आदेश वरिष्ठ पातळीवरून निघाल्याने बदलीस पात्र ठरलेल्या शिक्षक, संघटनांचे प्रतिनिधी आणि बीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तसेच लोकप्रतिनिधींमध्ये आज चांगलीच जुंपली होती. आता नव्या निकषानुसार १० पटसंख्या असलेल्या शाळेत एकच शिक्षक देण्याच्या सूचना आल्याने तालुक्‍यातील ५१ पैकी ४३ शिक्षकांचे समायोजन झाले तर उर्वरित ८ शिक्षकांचा प्रश्‍न कसा निकाली लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

शासनाच्या आदेशानुसार अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांना उपशिक्षकपद देऊन त्या शाळेतील उर्वरित शिक्षकांची सेवाज्येष्ठतेनुसार यादी करून समायोजन प्रक्रिया राबविण्याचे निश्‍चित केले होते. यानुसार ५ ऑगस्टपर्यंत हरकती आणि ८ ऑगस्टला समायोजन होणार होते. अचानकपणे नियोजित असलेल्या बदली प्रक्रियेत बदल झाला. यामुळे बदलीस पात्र असलेले तालुक्‍यातील ५१ शिक्षक आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांच्या दालनात धाव घेतली. सेवाज्येष्ठता यादी तयार केल्यावरून बराच काळ वाद रंगला. काही वेळाने गटविकास अधिकारी मनोज भोसले यांच्याकडे हा वाद गेला. सभापती भाग्यलक्ष्मी साटम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, मंगेश सावंत, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. तोडगा मात्र  निघाला नाही. 

अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधून ५१ शिक्षकांना तालुक्‍यातच सामावून घेतले जाईल का, याबाबत विचारणा केली. मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून तोंडी आदेश देवून बदलीची प्रक्रीया उद्यापर्यंत पूर्ण करावी, अशी सुचना आल्याने अतिरीक्त ठरणाऱ्या शिक्षकांचा प्रश्‍न मात्र अखेरपर्यंत सुटू शकलेला नाही. मुळात शैक्षणिक वर्ष सुरू होवून दीड महिन्याचा कालावधी लोटला तरीही बदलीची प्रक्रीया पूर्ण झाली नाही. त्यातच शिक्षकांच्या कौटुंबीक स्थलांतराबाबतही अनेक मुद्दे प्रकर्षाने पुढे येत आहेत. नव्या धोरणानुसार कमी पटसंख्येच्या शाळांना एकच शिक्षक दिला जात असल्याने पुढील काळात पालकवर्गातून असंतोष उमटणार आहे. याबाबतचा कोणताही विचार न करता बदली प्रक्रीया सक्तीने राबवून शिक्षकांवर अन्याय होत आहे असे आजच्या उपस्थित शिक्षकांमधून सांगण्यात येत होते. 

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या शिक्षक भरती धोरणानुसार आतंरजिल्हा बदलीचा मार्ग मोकळा झाला. ही प्रक्रीया राबविण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने आपल्या नेमणूकीपासून सेवाजेष्ठतेची यादी गटशिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत दिली. मात्र बदलीसाठी तयार करण्यात आलेल्या सेवाजेष्ठता यादीत अनेक त्रुटी असल्याचे आज निदर्शनास आले. मुळात कणकवली वगळता इतर तालुक्‍यामध्ये २५ जुलैला यादी प्रसिद्ध झाली होती. तर कणकवलीत ३१ जुलैला यादी प्रसिद्ध करून ५ ऑगस्टला हरकती देण्याबाबत सुचना होत्या. मात्र १ ऑगस्टच्या शिक्षण सचिवांच्या आदेशानंतर बदली प्रक्रीयेतील कार्यक्रमात आकस्मिक बदल करण्यात आले. बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना मंगळवारी सायंकाळी वॉटस्‌ अप वरून सुचना पाठवून २ ऑगस्टला हरकती आणि ३ ऑगस्टला समायोजन केले जाईल असे कळविण्यात आल्याने आज बदलीस प्राप्त असलेल्या शिक्षकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेवून आपल्यावर होत असलेल्या अन्यायांचा पाढा वाचला. मात्र मुख्य कार्यकारी यांच्या आदेशास आदीन राहून उद्या (ता.३) तालुक्‍यातील शिक्षकांचे समायोजन केले. जाईल अशी सुचना करून सदोष यादीची तात्काळ दुरूस्ती करण्याबाबत ठरविले. मात्र तालुक्‍यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षक हक्क कायद्यानुसार आणि संच मान्यतेनुसार केवळ एकच शिक्षक दिला जाईल, असे सांगितल्याने उपस्थित लोकप्रतिनिधींनी यावर नाराजी व्यक्त करून गटशिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ निवेदन दिले. प्रत्येक शाळेत दोन शिक्षक असलेच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली असून विद्यार्थ्यांची शैक्षणिकदृष्ट्या गैरसोय झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री. सावंत, पंचायत सीमती सदस्य मिलिंद मेस्त्री, मंगेश सावंत यांनी दिला आहे.

Web Title: konkan news teacher kankavali