जिल्ह्यात २ लाख ४२ हजार वृक्षलागवड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

लांज - ‘शेतकऱ्यांना लाभदायी ठरणाऱ्या फलोत्पादनाची निकड समजावून देऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती वाढवण्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्याची आवश्‍यकता आहे’, असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.

लांज - ‘शेतकऱ्यांना लाभदायी ठरणाऱ्या फलोत्पादनाची निकड समजावून देऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती वाढवण्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्याची आवश्‍यकता आहे’, असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.

राज्यात चार कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाचा आरंभ तालुक्‍यातील गवाणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिकेत श्री. वायकर यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. शासनाच्या वन विभागामार्फत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या ४ कोटी वृक्षांपैकी २ लाख ४२ हजार वृक्षलागवड रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ७ जुलैदरम्यान करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, आमदार राजन साळवी, जिल्ह्याचे पालकसचिव भगवान सहाय, पंचायत समिती लांजाच्या सभापती दीपाली दळवी, जिल्हाधिकारी प्रदीप पी., पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, विभागीय वनअधिकारी वि. रा. जगताप, तहसीलदार लांजा मारुती कांबळे, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. वन महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान लांजा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड व मानवी जीवन या संकल्पनेवर आधारित पथनाट्य सादर केले. श्री. वायकर यांच्या हस्ते रत्नागिरी येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृह व पोलिस अधीक्षक कार्यालय येथेही वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: konkan news tree plantation