सावंतवाडीमध्ये संरक्षक कठडा घरावर कोसळल्याने दोन जखमी

अमोल टेंबकर
गुरुवार, 20 जुलै 2017

सावंतवाडी: रस्ता खचून संरक्षक कठडा थेट घरावर कोसळल्याने तीन वर्षाच्या मुलीसह अन्य एक मुलगी जखमी झाल्याची घटना सातार्डा (ता. सावंतवाडी) येथे घडली.

ओवी आरोंदेकर (वय 3), क्षितीजा आरोंदेकर (वय 16) अशी जखमींची नावे आहेत. बुधवारी (ता. 19) रात्री दीड वाजता ही घटना घडली. दोघांना उपचारासाठी गोव्यात हलविण्यात आले आहे.

उदय आंरोदेकर यांच्या घरावर हा कठडा कोसळला. यात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले. विशेष म्हणजे दोन्ही मुलींच्या अंगावर मातीचा ढीगारा होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर माजी सरपंच उदय पारीपत्ये यांनी आपल्या सहकाऱयासह त्या ठिकाणी धाव घेवून मदतकार्यात सहभाग घेतला.

दरम्यान, कवठणी भागात रस्ता खचल्याचा प्रकार दोन ठिकाणी घडला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: konkan news Two injured in collapsing house in sawantwadi

टॅग्स