जिल्ह्यात भाज्यांचे दर कडाडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

ग्राहकांच्या खिशाला चाट - टोमॅटो १२०, तर दोडका १६० रुपये किलो

सावंतवाडी - भाज्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत. दुपटीने वाढलेले दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेल्यामुळे ऐन श्रावणात भाज्यांच्या चढ्या दराने ग्राहकांच्या खिशाला चाट बसत आहे. बाजारात टोमॅटोचे दर १२० रुपये तर दोडका १६० रुपये किलो आहे.

पावसाळा सुरू झाल्यावर शहरी भागातील भाज्यांचे दर काहीसे उतरणीला लागले होते. दरम्यान, श्रावण चालू होण्याच्या आठवडापूर्वीच भाज्यांचे दर वाढतच जात असल्याचे दिसून आले. कडाडलेल्या दरांमुळे भाजी खाण्यावर संक्रांत आली असल्याचे दिसून येत आहे. श्रावणात विशेषतः ताटात भाजीची उपलब्धता आवश्‍यक समजली जात असल्याने नागरिकांना न परवडत नसतानाही नागरिक नामुष्कीने कमी स्वरूपात भाज्यांची खरेदी करीत आहेत. 

ग्रामीण भागात विकण्यात येणाऱ्या भाज्यांचे दर पाहता टोमॅटो, फरसबी, वाली, गाजर, दोडकी अशा बऱ्याच भाज्यांना महागाईची फोडणी मिळालेली दिसत आहे. यात टोमॅटो १२० रुपये किलो, फरसबी १६० रुपये किलो, वाली १८० रुपये किलो, मटार १६० रुपये किलो, दोडकी १६० रुपये किलो, गेल्या आठवड्यात वाढलेले गाजराचे दर १० रुपयांनी खाली आले तरी ते अद्यापही ८० रुपये एवढे महाग आहे. मेथीपेंडी २० ऐवजी ४० ने दोन अशी विकली जात आहे. इतर भाज्यांचे दर पाहता मटार ८० रुपये किलो, कारली ६० रुपये किलो, गवार ८० रुपये किलो अशा दराने विकण्यात येत आहेत. याच आठवड्यात श्रावण चालू झाला आहे. यामुळे नागरिक जेवणात भाज्यांना पसंती देतात, असे असले तरी ग्रामीण भागात भाज्याचे दर पाहता खरेदी करताना नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: konkan news vegetable rate increase

टॅग्स