पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

चिपळूण - अडरे धरणात पोहण्यासाठी गेलेल्या चिंचघरी येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली. गणेश कृष्णा चाळके (वय २४, रा. चिंचघरी) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

चिपळूण - अडरे धरणात पोहण्यासाठी गेलेल्या चिंचघरी येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली. गणेश कृष्णा चाळके (वय २४, रा. चिंचघरी) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

चिंचघरी येथील गणेश चाळके हा तरुण १३ जुलैला दुपारी २ वाजता मित्रांबरोबर अडरे धरणात पोहण्यासाठी गेला होता. अडरे धरणाच्या खाली धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तालुक्‍याच्या ठिकठिकाणांहून नागरिक येतात. चिंचघरी येथील काही तरुण गणेश चाळकेसह धरणात आंघोळ करण्यासाठी गेले. गणेश पाण्यात उतरल्यानंतर तो अचानक गायब झाला. त्याच्या मित्रांशी शोधाशोध केली तरी तो सापडला नाही. शनिवारी सकाळी ७.३० वाजता त्याचा मृतदेह धरणाच्या काठावर आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गणेशचा भाऊ मनोज चाळके यांना अलोरे-शिरगावचे पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. गणेशचा मृतदेह नागरिकांनी बाहेर काढला. विच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. धरणातील दलदलीत अडकून राहिल्यामुळे गणेशचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: konkan news youth drowned in death