जव्हारच्या नगराध्यक्ष पदासाठी, चौरंगी लढत

जव्हारच्या नगराध्यक्ष पदासाठी, चौरंगी लढत

मोखाडा -  ऐतिहासिक वारसा जपणारी, जव्हार नगरिषद यंदा शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. त्यामुळे यावेळच्या   13   डिसेंबर ला होणाऱ्या     सार्वत्रिक निवडणूकीला महत्त्व आले आहे. प्रथमच थेट मतदारांकडुन नगराध्यक्ष निवडुन येणार आहे.

नगराध्यक्ष पदासाठी  5  ऊमेदवार रिंगणात असलेतरी शिवसेनेचे चंद्रकांत पटेल, जव्हार प्रतिष्ठान व भाजप युती चे भरत पाटील, राष्ट्रवादी चे संदिप वैद्य आणि काॅग्रेस पुरस्कृत दिलीप तेंडुलकर अशी चौरंगी लढत होणार आहे. तर नगरपरिषदेच्या   17   जागांसाठी   8   प्रभागातून   66   ऊमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.
जव्हार नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी नंतर निर्णायक चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी आता एकूण    5   ऊमेदवार रिंगणात असलेतरी शिवसेनेचे चंद्रकांत पटेल, जव्हार प्रतिष्ठान व भाजप युती चे भरत पाटील, राष्ट्रवादी चे संदिप वैद्य आणि काॅग्रेस पुरस्कृत दिलीप तेंडुलकर या मातब्बर ऊमेदवारांध्ये चौरंगी लढत होणार आहे. तर नगरपरिषदेच्या  17   जागांसाठी   8   प्रभागातून   66   ऊमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. यासाठी जव्हार मधील   3 हजार   993  पुरूष व    4   हजार   20  स्री असे एकूण    8   हजार   13   मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सत्ताधारी राष्ट्रवादी काॅग्रेस ला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष काॅग्रेस पुरस्कृत उमेदवार दिलीप तेंडुलकर यांच्या ऊमेदवारी मुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक अधिकच रंगतदार आणि चुरशीची बनली आहे. त्यांना राष्ट्रवादी च्या रणनीती ची चांगलीच माहीती आहे. तसेच तेंडुलकर कुटुंबाचे योगदान, त्यांचे वडील दिवंगत बबनशेठ तेंडुलकर यांनी   17  वर्ष नगराध्यक्ष पद भुषऊन शहराच्या विकासात दिले असल्याने दिलीप तेंडुलकर यांच्या गाठीशी या दोन जमेच्या बाजु आहेत. तर गत वेळी राष्ट्रवादी चे नेते अजित पवार आणि नवाब मलिक यांनी जव्हार मध्ये सभा घेऊन निवडणुकीचे चित्र पालटले होते, त्यामुळे  राष्ट्रवादी ला  17  पैकी   14  जागा जिंकून घवघवीत यश मिळाले होते. यावेळी राष्ट्रवादी ला अधिक मेहनत घेऊन, आपली रणनीती बदलावी लागणार आहे. विद्यमान नगराध्यक्ष संदीप वैद्य हेच राष्ट्रवादी चे ऊमेदवार आहेत. नगराध्यक्ष काळात आपण केलेली विकास कामे , हाच ऐकमेव अजेंडा त्यांच्याकडे , मतदारांना आकर्षित करण्यासाठी आहे.

तर गत वेळी केलेल्या चुका सुधारून, शिवसेनेने नव्या दमाने निवडणुकीची रणनीती आखली आहे. शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी या निवडणुकीचे सुत्र हाती घेतले आहेत. शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे ऊमेदवार चंद्रकांत पटेल राष्ट्रवादी च्या पांच वर्षाच्या कार्यकाळाचा लेखाजोखा, मतदारांपुढे मांडून सत्ताधारी राष्ट्रवादी च्या कारभाराचे वाभाडे मतदारांपुढे मांडण्याची संधी सोडणार नाहीत. त्यातच माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांच्या  कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा प्रचारात चांगलाच ऊपयोग पटेल यांना होणार आहे.

दरम्यान, पोटनिवडणूकीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊन  5  पैकी  4 जागा जिंकून जव्हार प्रतिष्ठान ने नगरपरिषदेत दमदार प्रवेश केला होता. त्यामुळे या निवडणूकीसाठी जव्हार प्रतिष्ठान च्या अपेक्षा ऊंचावल्या आहेत. मातब्बरांना शह देण्यासाठी जव्हार प्रतिष्ठान व भाजप युती ने मोठे आव्हान उभे केले आहे. प्रतिष्ठान चे अध्यक्ष भरत पाटील हे या युतीकडून नगराध्यक्ष पदाचे ऊमेदवार आहेत. त्यांना केंद्रात, राज्यात आणि जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या भाजप चे बळ मिळाले आहे. पालकमंत्री विष्णु सवरा, खासदार अॅड.चिंतामण वनगा यांची साथ भरत पाटील यांना मिळाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होत असुन , त्यासाठी सर्वच पक्षांमधील नेत्यांचा, कार्यकर्ते, आणि ऊमेदवारांचा कस लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com