esakal | कोकण: दुचाकींच्या धडकेत सावंतवाडीत वृद्ध गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

accident

कोकण: दुचाकींच्या धडकेत सावंतवाडीत वृद्ध गंभीर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सावंतवाडी : सालईवाडा येथे दोन दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत एक वृद्ध गंभीर जखमी झाला. हा अपघात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. जखमी वयोवृद्धाला प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी कुडाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

हेही वाचा: कोकणात मधुमक्षिकापालन व्यवसायाला मिळणार चालना

दुचाकी घेऊन वृद्ध व्यक्ती सावंतवाडीहून माजगावच्या दिशेने जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीस्वराची समोरासमोर धडक झाली. यात ते जखमी झाले. अपघात होताच घटनास्थळी गर्दी झाली होती. अपघात पाहण्यासाठी रस्त्यावर गाड्या लावल्याने ट्राफिक देखील झाले होते.

याबाबत माहिती पोलिसांना समजताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी त्या वयोवृद्धाला धीर देत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी कुडाळ येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

loading image
go to top