सुधागड तालुक्यातील गोवंश हत्या प्रकरणातील चार आरोपी जेरबंद

अमित गवळे
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

या गुन्ह्यातील महम्मद रमजान उर्फ फिरोज अंगा रफिक शेख (वय. 22) रा. गोविंदवाडी कल्याण या अारोपीस पाली पोलीसांनी 17 ऑगस्टला अटक केली होती. उर्वरित  आरोपींचा शोध घेण्यासाठी पाली पोलीसांनी सापळा रचला होता

पाली -  सुधागड तालुक्यातील शरदवाडी गावच्या हद्दीत ६ ऑगस्टला मध्यरात्री अज्ञात आरोपींनी तीन जनावरांची हत्या केली होती. अारोपी दोन बैल व एक खोंड अशा तीन जनावरांचे चामडे व पोटले जागीच टाकून मांस घेवून फरार झाले होते. पाली पोलीसांनी या गुन्ह्यातील चार आरोपींना नुकतीच अटक केली अाहे.

या गुन्ह्यातील महम्मद रमजान उर्फ फिरोज अंगा रफिक शेख (वय. 22) रा. गोविंदवाडी कल्याण या अारोपीस पाली पोलीसांनी 17 ऑगस्टला अटक केली होती. उर्वरित  आरोपींचा शोध घेण्यासाठी पाली पोलीसांनी सापळा रचला होता. त्यानंतर फिरोज उर्फ आवली अकबर सय्यद (वय.23) रा. गोविंदवाडी यांस 19 ऑगस्टला अटक केली. तसेच इंतजार अली उर्फ मुल्ला मुदीअली शेख (वय32) रा. सिबलीनगर मुंब्रा, मुळ रा.उत्तरप्रदेश यास 29 सप्टेंबरला अटक करुन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली. त्यानंतर सदरचे मांस खरेदी करणारा नबी अहम्मद तुफेल अहमद खुरेशी रा.निजामपुरा भिवंडी यांस मंगळवारी (ता.3) अटक केली.

या गुन्ह्याचा अधिक तपास पाली पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील, पोलिस नाईक विनोद पाटील,पोलिस काँन्स्टेबल अमोल म्हात्रे करीत आहेत

Web Title: konkan raigad news: police arrest