डबल डेकर रात्री चालविण्यास कोकण रेल्वे सकारात्मक 

डबल डेकर रात्री चालविण्यास कोकण रेल्वे सकारात्मक 

रत्नागिरी - कोकण रेल्वेमध्ये मराठी भाषेचा वापर आणि डबल डेकर रात्रीची चालविण्यात यावी, आदी मागण्या कोकण रेल्वेच्या अध्यक्षांकडे करण्यात आल्या. कोकण विकास समन्वय समितीने यासाठी साकडे घातले. यावर डबल डेकर रात्री चालविण्यासंदर्भात कोकण रेल्वे सकारात्मक असल्याचे समितीने सांगितले.

कोकण विकास समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी गाड्यांमधील अस्वच्छता संदर्भात तसेच जेवणाचे डबे टॉयलेट जवळ ठेवू नये असे ही निदर्शनास आणून दिले. 

शिष्टमंडळाने केलेल्या मागण्या - 

  • कोकण रेल्वेत मराठी भाषेचा वापर प्राधान्याने झाला पाहिजे,
  • 80 टक्‍के मराठी कामगार असले पाहिजेत
  • तिकिट आरक्षण अर्ज मराठी भाषेतून उपलब्ध करुन द्यावा.
  • कोकण रेल्वेत धावणाऱ्या गाड्यांपैकी अनावश्‍यक गाड्या बंद कराव्यात. त्या जागी कोकणासाठी गाड्या सोडाव्यात.
  • सणवारांना कोकणचा कोटा वाढवावा आणि आरक्षण 30 दिवस अगोदर द्यावे

रेल्वेतील कंत्राटे स्थानिकांना मिळावेत या मागणीवर सर्व कंत्राटे आम्ही स्थानिकांनाच देतो असे सांगितले. तर सर्व रेल्वे स्थानकावर विश्रांतीगृह असावे व तिथे चहा बिस्किटाची सोय असावी या मागणीवर सर्वच स्थानकांवर विश्रांतीगृह असून तिथे स्टॉल चालवायला कोणी स्थानिक तयार नाही असे सांगण्यात आले. एका ठिकाणी चालवायला दिले आहे व त्यानेच भैयांना कामाला ठेवले असल्याचे सांगण्यात आले.

डबल डेकर गाडी रात्री चालविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अध्यक्षांनी दिली. तुतारी गाडीचे 2 डबे रद्द करुन आसन व्यवस्थेत प्रत्येक डब्यात 4 जागा वाढल्याची माहिती दिली. पुणे लोणावळा धर्तीवर पनवेल ते चिपळूण व चिपळूण ते सावंतवाडी डेमू सुरु कराव्यात.

यावेळी प्रमोद मसुरकर, राजेश फाटक, सत्यजित चव्हाण, मंदार नार्वेकर, अतुल देसाई, धर्मेद्र घाग, नितीन गांधी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com