कोकण रेल्वेमार्गावर उन्हाळी हंगामासाठी विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

कणकवली - उन्हाळी सुटीच्या हंगामातील वाढत्या प्रवासीवर्गाला सेवा देण्यासाठी यंदा कोकण रेल्वेमार्गावर विशेष उन्हाळी गाड्या धावणार आहेत. यंदा दक्षिण, पश्‍चिम विभागाबरोबरच मडगाव ते नागपूर अजनीपर्यंत नवीन विशेष गाडी सुरू केली आहे. या गाड्या एप्रिल, मे आणि जून या कालावधीत धावणार असून जादा गाड्यांचे आरक्षणही सुरू झाले आहे. 

कणकवली - उन्हाळी सुटीच्या हंगामातील वाढत्या प्रवासीवर्गाला सेवा देण्यासाठी यंदा कोकण रेल्वेमार्गावर विशेष उन्हाळी गाड्या धावणार आहेत. यंदा दक्षिण, पश्‍चिम विभागाबरोबरच मडगाव ते नागपूर अजनीपर्यंत नवीन विशेष गाडी सुरू केली आहे. या गाड्या एप्रिल, मे आणि जून या कालावधीत धावणार असून जादा गाड्यांचे आरक्षणही सुरू झाले आहे. 

सीएसटी ते सावंतवाडी ०१००१ ही गाडी २ जूनपर्यंत दर शुक्रवारी मुंबई सीएसटी येथून रात्री ११.५५ वाजता सुटणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी येथे थांबा दिला आहे. परतीसाठी ०१००२ ही गाडी ३ जूनपर्यंत दर शनिवारी दुपारी बारा वाजता सावंतवाडी येथून सुटून सीएसटीला रात्री १०.३० वाजता पोचेल. 

लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी  ०१०४५ ही गाडी ३ जूनपर्यंत धावणार आहे. ही गाडी दर शनिवारी पहाटे ५.३३ वाजता एलटीटीवरून सुटून सावंतवाडीला दुपारी चार वाजता पोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्‍वर, रत्नागिरी, विलवडे, राजापूर, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी येथे थांबे देण्यात आले आहेत. परतीसाठी ०१०४६ ही गाडी ४ जूनपर्यंत दर रविवारी सावंतवाडी येथून दुपारी बारा वाजता सुटून एलटीटी येथे रात्री ११.४५ वाजता पोचणार आहे. 

सीएसटी ते एर्नाकुलम ही गाडी १८ एप्रलि ते ६ जून या कालावधीत धावणार आहे. ही गाडी ०१०६५ सीएसटीएम येथून दर मंगळवारी दुपारी ३.१५ वाजता सुटून एर्नाकुलमला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.१५ वाजचा पोचणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिवीम, मडगाव, कारगाव, कुमठा, भटकल, उडपी, मंगळूर, एर्नाकुलम असे थांबे आहेत. परतीसाठी ०१०६६ ही गाडी दर बुधवारी १९ एप्रिल ते ७ जून या कालावधीत एर्नाकुलम येथून रात्री ११ वाजता सुटून सीएसटीला तिसऱ्या दिवशी रात्री १२.४० ला पोचेल. 

अजनी जंक्‍शन ते मडगाव ही गाडी ३ एप्रिल ते ५ जून या कालावधीत धावणार असून, अजनी येथून ०१११९ ही गाडी दर सोमवारी सायंकाळी ७.५० ला सुटून मडगावला दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० ला पोचणार आहे. या गाडीला वर्धा, धमणगाव, बादणेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिवीम, मडगाव येथे थांबे देण्यात आले आहेत. परतीसाठी ६ जूनपर्यंत दर मंगळवारी मडगाव येथून ०११२० ही गाडी रात्री १०.४५ वाजता सुटून अजणी येथे दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता पोचणार आहे. 

पुणे ते तिरुणवेली या मार्गावर २ एप्रिल ते ४ जून या कालावधीत ०१३२१ ही गाडी दर रविवारी सुटणार आहे. पुणे येथून ४.१५ ला सुटून तिरुणवेलीला तिसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता पोचणार आहे. या गाडीला लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिवीम, मडगाव ते एर्नाकुलम असे थांबे देण्यात आले आहेत. परतीसाठी तिरूणवेली येथून ०१३२२ ही गाडी दर मंगळवारी सकाळी ७.२० ला सुटून पुणे येथे दुसऱ्या दिवशी ८.४० ला पोचेल. पुणे ते एर्नाकुलम ही गाडी ८ जूनपर्यंत दर मंगळवारी ०१३२३ पुणे येथून सायंकाळी ४.१५ ला सुटून एर्नाकुलमला दुसऱ्या दिवशी रात्री ८.१५ वाजता पोचणार आहे. परतीसाठी ०१३२४ ही गाडी दर शुक्रवारी एर्नाकुलम येथून रात्री ११.३० ला सुटून पुणे येथे तिसऱ्या दिवशी २.४५ वाजता पोचणार आहे. एलटीटी ते करमळी ही सुपरफास्ट गाडी दर शुक्रवारी २ जूनपर्यंत धावणार आहे. एलटीटी येथून ०२००५ ही गाडी रात्री १.१० वाजता सुटून करमळीला सकाळी ११ वाजता पोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ ते करमळी असे थांबे असून परतीसाठी ०२००६ ही गाडी त्याच दिवशी दुपारी दोन वाजता करमळी येथून सुटून एलटीटीला रात्री ११.५० ला पोचेल. कोईमतूर ते जबलपूर ही गाडी ५ जूनपर्यंत धावणार असून कोईमतूर येथून ०२१९७ दर सोमवारी सायंकाळी ७ वा. सूटून जबलपूरला तिसऱ्या दिवशी सकाळी १०.२० ला पोचणार आहे. परतीसाठी जबलपूर येथून ०२१९८ ही गाडी सकाळी ११ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी कोईमतूरला पहाटे चार वाजता पोचणार आहे.

बिलासपूर जंक्‍शन ते मडगाव ही गाडी ४ जूनपर्यंत दर रविवारी ०८२९७ ही सुटणार असून मडगाव येथून ०८२९८  ही गाडी दर मंगळवारी मडगाव येथून सकाळी १० वाजता सुटणार आहे. तिरूणवेली ते गांधीधाम ही गाडी १३ एप्रिल, ८, १५, २२, २९ जूनला तिरूणवेली येथून ०९४५७ ही गाजी ७.४५ वाजता सुटणार आहे. परतीसाठी ०९४५८ ही गाडी ५, १२, १९ आणि २६ जूनला गांधीधाम येथून दुपारी १.५० वाजता सुटणार आहे.

Web Title: konkan railway route summer season special railway