#KonkanRains रत्नागिरीत पुराने सव्वादोन कोटींचे नुकसान

#KonkanRains रत्नागिरीत पुराने सव्वादोन कोटींचे नुकसान

रत्नागिरी - ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी तालुक्‍याला मोठा तडाखा बसला. पुराचे पाणी अनेकांच्या घरात शिरले होते. त्यात समुद्राच्या उधाणाची भर पडली. भरतीचे पाणी किनाऱ्यांवरील वस्तीत घसून अनेकांना फटका बसला. एकट्या रत्नागिरी तालुक्‍यातील ४३ गावांमधील ७६२ कुटुंबांचे सव्वादोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक एक कोटीचे नुकसान चांदेराई गावात झाले आहे.

ऑगस्टच्या सुरवातीला अमावस्येच्या तोंडावर रत्नागिरी तालुक्‍यात सलग तीन दिवस दीडशे ते दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्याचबरोबर काजळी नदीच्या उगमाजवळ साखरप्यातही पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे काजळी नदील सलग चार ते पाच वेळा पूर आला.

२ ते ४ ऑगस्ट या कालावधीत पूर आणि भरतीमुळे काजळीच्या प्रभावाखालील हरचेरी, चांदेराई, सोमेश्‍वर, पोमेंडी, टेंब्ये या गावातील साडेतीनशे घरे पाण्याखाली गेली होती. घरातील साहित्य पुराच्या पाण्यामुळे भिजून मोठे नुकसान झाले होते. चांदेराई बाजारपेठेसह मोहल्ला पाण्याखाली होती. तेथील सुमारे दीडशे घरांना पुराचा तडाखा बसला. याच कालावधीत समुद्राला आलेल्या उधाणामुळे मालगुंड, गणपतीपुळे, गावखडी, वरवडे, काळबादेवी किनाऱ्यांना बसला. तेथील घरात पाणी घुसले होते. 

७६२ घरांचे नुकसान 

पावसामुळे मागील पंधरवड्यात तालुक्‍यातील छोट्या-मोठ्या नद्यांना पूर आला होता. त्यात अनक घरांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान चांदेराईत १४७ घरांचे एक कोटी रुपये, गावडे-आंबेरेत १३६ घरांचे ५६ लाख १७ हजार रुपये, नवा सोमेश्‍वरमधील ९६ घरांचे एकवीस लाख रुपयांचे नुकसान नोंदविले गेले. तालुक्‍यात सगळी मिळून ७६२ घरांचे नुकसान पंचनाम्यात नोंदविले गेले आहेत. तहसीलदार कार्यालयाकडून त्याची नोंद घेण्यात आली असून बाधितांना तत्काळ मदत वाटप करण्यात येणार आहे.

गावे, घरे बाधित
गावांसह घरांचे नुकसान - हरचेरी ८१ घरांचे १० लाख ३२ हजार, सोमेश्‍वर ३० घरांचे १० लाख ४० हजार, पोमेंडी बुद्रुक २ लाख ९८ हजार, टेंब्ये १२ लाख १८ हजार, पोमेंडी खुर्द १४ घरांचे ५७ हजार, हातीस ९ घरांचे ११ लाख ३८ हजार, तोणदे ९ घरांचे दहा हजार, चिंचखरी ७ घरांचे १ लाख रुपये, जुवे ६१ घरांचे ४ लाख १२ हजार, उमरेत ३१ घरांचे १८ लाख ६० हजार, मिऱ्या १५ घरांचे १,३६,०००, मालगुंड ४ घरांचे ८९ हजार, भंडारवाडा २ घरांच एक लाख, काळबादेवी ५ घरांचे ५४ हजार, झाडगाव राहाटाघर १७ घरांचे ३ लाख.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com