#KonkanRains तिलारी धरणातून 37 हजार 030 क्युसेक्स विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

सांवतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरणातून 37 हजार 030 इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 

सांवतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरणातून 37 हजार 030 इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 

तिलारी धरणाचे चारही दरवाजे खुले करण्यात आले आहेत. या धरणाच्या दरवाजातून 37 हजार 030 इतका पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. या भागात अजूनही पूरस्थिती कायम आहे. 

पावसाळा सुरू होताच हे चारही दरवाजे उघडण्यात येतात. पावसाळ्यात या दरवाजातून पाण्याचा विसर्ग होतच असतो. पण या धरणातून होणाऱ्या पाण्याचा विसर्गामुळे तसेच दोडामार्ग तालुक्यात पडणाऱ्या मुसळधारेमुळे या परिसरातील दोडामार्ग, बेडकी आदी गावाला पुराचा वेढा बसला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Rains 37030 cusecs water discharge from Tilari Dam