विद्यार्थ्यांची शिबिरात मोफत दंत तपासणी

लक्ष्मण डुबे 
बुधवार, 28 मार्च 2018

रसायनी - रसायनीतील वडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दितील वाशिवली येथील डॉ पारनेरकर महाराज विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये मंगळवार (ता 27) रोजी श्री समर्थ सामाजिक संस्था रसायनी आणि हाय-टेक कार्बन जनसेवा ट्रस्ट यांच्या वतीने दंत तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीराला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  

यावेळी विद्यालयाचे प्राध्यापक डॉ अनिल पाटील, श्री समर्थ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील, हाय-टेक कार्बन जनसेवा ट्रस्टचे लक्ष्मण मोरे आदि उपस्थित होते. 

कामोठे येथील एम जी एम रूग्णालयातील दंत चिकित्सा विभागातील डॉक्टरांच्या पथकांनी शिबीरात पहली ते पाचवी पर्यंतच्या 135 विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी केली. यावेळी विद्यार्थ्यांना कोलगेट आणि टुथ ब्रशने दातांची निगा कशी राखावी याबद्दल माहिती दिली. तसेच प्रात्यक्षिक देखील करून दाखवले. काही विद्यार्थ्यांना दातांची समस्या होती त्यांना पुढील उपचाराकारिता एम.जी.एम्. कामोठे येथील रूग्णालयात पालकांना सोबत घेऊन येण्यास डॉक्टरांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना टुथ ब्रश आणि काँलगेटचे वाटप करण्यात आले. 

Web Title: konkan students dental checkup camp

टॅग्स