कॉन्टिनेंटल गोदामातून येणाऱ्या उग्र वासाने गावकरी हैराण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

उरण- खोपटे गावातील कॉन्टिनेंटल गोदामात उघड्यवार ठेवण्यात आलेल्या सडक्या चण्याच्या वासने गावकरी हैराण झाले होते. अखेर कंपनीला जाब विचारण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला. मात्र कंपनीचा कंत्राटदार पुरुषोत्तम रेडडी यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. संतप्त महिलांनी त्यामुळे रेड्डी यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच नारगिकांचा रोष पाहून अखेर प्रशासनाने या सडक्या चण्यांवर माती टाकून ते झाकून ठेवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती खोपटे गावकऱ्याने दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.

दरम्यान, संध्याकाळच्या सुमारास अडगळीच्या ठिकाणी हे कंटेनर उघडे करून कंपनीच्या लोकांना नक्की काय साध्य करायचे होते असा सवाल गावकरी विचारीत आहेत. कंपनीच्या वतीने मात्र कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यात आले नाही. अखेर बळजबरीने आता शिरलेल्या पत्रकारांना घटनास्थळाचे फोटो काढता आले. हा सडका चणा कोणी आणला होता? तो कुठे नेला जाणार होता? या कोणत्या ही बाबतीत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. 

दरम्यान, उरणच्या खोपटे खाडी किनारी असलेले हे कॉन्टिनेंटल गोदाम सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या कंपनीने जमिनी घेऊनही नोकऱ्या न दिल्याने कंपनीच्या निषेधार्थ शेतकऱयांनी आंदोलन केले होते. समुद्राला अगदी खेटून असलेल्या या कंपनीने सी आर झेड कायद्याचे उल्लंघन केल्याचेही समोर आले आहे. मात्र कंपनीच्या मालकांचे सरकारातील उच्च पदस्थांशी असलेल्या लागेबांध्यांच्या मुळे कंपनीवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे नारगिकांचे म्हणणे आहे. 

''कंपनीत कोणत्यातरी कंटेनर मधून वायुगळती झाली की काय अशी शंका गावकऱ्यांमध्ये होती. मात्र याची खातरजमा करण्यासाठी शेकडो गावकरी थेट कंपनीत जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. शिवाय कंपनीच्या कंत्राटदाराने सडक्या चण्यांवर माती टाकून वास दडपण्याचा प्रयत्न केला असून, उद्या सकाळी गावकरी याबाबत तहसीलदाराकडे रितसर तक्रार करणार असल्याची माहिती मनसेचे विभागप्रमुख प्रशांत रमेश ठाकूर यांनी बोलताना दिली.

Web Title: konkan uran continental godown gram