कोकण विकास आघाडीचे रविवारी अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मुंबई : कोकण विकास आघाडीचे 38 वे वार्षिक अधिवेशन 25 डिसेंबरला दादरमध्ये होणार आहे. अधिवेशनात कोकणातील उद्योग, शेती, आरोग्य, विमानतळ आदी प्रश्‍नांवर परिसंवाद होतील.

शिवाजी पार्क परिसरातील कोहिनूर मिल क्र. 3 जवळच्या पद्माबाई ठक्कर मार्गावरील हरी महादेव वैद्य सभागृहात सकाळी 10 पासून हे अधिवेशन होईल.

अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी मोहन केळूसकर असून, शिक्षणतज्ज्ञ मधुकर नार्वेकर स्वागताध्यक्ष आहेत. डॉ. माधव गाडगीळ समितीचा अहवाल, प्रादेशिक असमतोलाबाबत नेमलेल्या डॉ. विजय केळकर समितीचा अहवाल, कोकणातील वाहतूक, कोकण रेल्वेचे प्रश्‍न, बोट वाहतूक, उद्योजकांच्या समस्या, जलसिंचन योजना, कोकणासाठी वैधानिक विकास मंडळ, कोकणाचे बरखास्त केलेले मत्स्यविकास महामंडळ, स्वतंत्र कोकण राज्य आदी विषयांवर चर्चा करून ठराव संमत केले जाणार आहेत.

Web Title: konkan vikas aghadi meet