आनंदाश्रम आश्रमास मदत - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

कुडाळ - ‘समाजातील निराधार, अपंगांना आधार देण्याचे संजीवन जीवनट्रस्ट आनंदाश्रम व संविता आश्रमाचे कार्य फार मोठे आहे. या संस्थांसाठी भविष्यात आपले नेहमीच सहकार्य राहील,’ असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज अणाव व पणदूर येथे केले. पालकमंत्री केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज त्यांनी अणाव येथील बबन परब यांच्या आनंदाश्रम व संदीप परब यांच्या पणदूर येथील संविता आश्रमाला भेट देऊन पाहणी केली. केसरकर म्हणाले,‘‘आनंदाश्रम संस्था समाजात फार मोठे काम करीत आहे. येथे आलेल्या निराधार, अपंगांना आधार देत त्यांची सेवा करण्याचे काम संजीवन संस्था करते.

कुडाळ - ‘समाजातील निराधार, अपंगांना आधार देण्याचे संजीवन जीवनट्रस्ट आनंदाश्रम व संविता आश्रमाचे कार्य फार मोठे आहे. या संस्थांसाठी भविष्यात आपले नेहमीच सहकार्य राहील,’ असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज अणाव व पणदूर येथे केले. पालकमंत्री केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज त्यांनी अणाव येथील बबन परब यांच्या आनंदाश्रम व संदीप परब यांच्या पणदूर येथील संविता आश्रमाला भेट देऊन पाहणी केली. केसरकर म्हणाले,‘‘आनंदाश्रम संस्था समाजात फार मोठे काम करीत आहे. येथे आलेल्या निराधार, अपंगांना आधार देत त्यांची सेवा करण्याचे काम संजीवन संस्था करते. भविष्यात या संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी माझे नेहमीच सहकार्य राहील. या आनंदाश्रम येणारा रस्ता इतर समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील. दरमहा या संस्थेला वीस हजारांची मदत दिली जाईल.’’ आज आनंदाश्रमाला २५ हजारांचे धान्य तसेच सर्वाना खाऊ वाटप करण्यात आले.

आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य गटनेते नागेंद्र परब, अमरसेन सावंत, अभय शिरसाट, स्नेहा दळवी, जयभारत पालव यांनी केसरकर यांना सुभेच्छा  दिल्या. त्यानंतर  केसरकर यांनी पणदूर येथील संविता आश्रमाला भेट दिली. या वेळी संस्थेला २५ हजारांचा धनादेश दिला. सर्वासमवेत त्यांनी केकही कापला. या वेळी आमदार नाईक, नागेंद्र परब, प्रकाश परब, अभय शिरसाट, मोहन नीाक, स्नेहा दळवी, जयभारत पालव, सुबोध सामंत, शामसुंदर सावंत, साजूराम नाईक, नरेंद्र राणे, प्रताप साईल, बाळा पवार, नगरसेवक गणेश भोगटे, आबा शिरसाट, शेखर सामंत, शिवसैनिक आदी उपस्थित होते. त्यानंतर वेताळबांबर्डे येथे कातकरी समाजातील मुलांसाठी तेथील वसतीगृहाला धान्याचे वाटप नागेंद्र परब यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच दिलीप तिवरेकर, साजूराम नाईक, नरेंद्र राणे, बबन कदम, चंद्रकांत सावंत, बी.डी. पिंटो उपस्थित होते.

Web Title: kudal konkan news deepak kesarkar help to anandashram ashram